पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

DIET TO PREVENT HEART DISEASE / हृदयविकार टाळण्यासाठी आहार

इमेज
DI ET TO PREVENT HEART DISEASE: हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा. DI  जाणून घ्या लक्षणे आणि उपाय,आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरावर मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. जेवणाची, झोपण्याची वेळ चुकत असल्याने त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. त्यामुळे आजकालच्या तरुणाईला विविध रोगांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय वाढत्या प्रदूषणामुळे आपले शरीर कमकुवत होत चालले आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच हृदयविकाराचा त्रास संभवत आहे. आधीच्या काळात हृदयविकार हा आजार वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र आता हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होत आहे. WHO आणि अमेरिकन जर्नलच्या अभ्यासानुसार, 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयाच्या समस्यांमध्ये 13 टक्के वाढ झाली असल्याचे म्हणले आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठा आजार हृदयविकार हा झाला आहे. अहवालानुसार गेल्या तीन दशकांत भारत देशात हृदयविकाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अगदी दुप्पट झा...

हलासन / HALASAN

इमेज
       हलासन : अवधी १ मिनीट लाभ :-    मेरुदंडाला लागून असलेल्या नाड्यांवर तणाव आणला जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढते.  पाटीच्या कण्याची लवचिकता वाढविली जाते. त्यामुळे नेहमी तारुण्य अनुभवास येते.  यकृत, हृदय इ. इंद्रियांची कार्यक्षमता वाढते. पोट व कमरेच्या भागांतील अनावश्यक मेद कमी होऊन बांधा सडसडीत व सुडौल होतो. अग्निमांद्य, अपचन, वातविकार इ. दूर केले जातात.  ओटीपोटांतील ७२,००० नाटयांच्या प्राथमिक शुद्धिकरणास मदत होते. स्त्रियांच्या मासिकाच्या दोषांवर चांगला परिणाम होतो.

सर्वांगासन योगासन करण्याचे फायदे / sarvangasana benefits

इमेज
  1 ) सर्वांगासन :   अवधी  :  ३ते५मिनीटे   लाभ :-   1) मेंदूकडे होणारा रक्त पुरवठा वाढविला जातो .  2) थायरॉइड्सची कार्यक्षमता वाढते .  3) दृष्टी सुधारून डोळ्यांचे काही किरकोळ विकार दूर होतात .     4) सर्वांगासन ' निर्धोक व सहज साध्य असून ते शिर्षासनाला सर्वोत्तम असे पर्यायी आसन आहे .  5) केस गळणे कमी होते .  6)   त्वचा निरोगी , चमकदार राहण्यास मदत होते . 7) शिर्षासनाचे सर्व लाभ या आसनांत मिळतात . शरीर चपळ व बुद्धी तल्लख बनते .     8)   प्राणायामादि कर्मानंतर प्राणाची उर्ध्वगति टिकविण्यासाठी तसेच ' विपरित करणी मुद्रे साठी आवश्यक व उपयुक्त असे हे आसन आहे .

SURYA NAMASKAR YOGA / सूर्यनमस्कार'

इमेज
  उत्तम शारीरिक स्वास्थ्य व सामर्थ्य वाढविणारा व्यायाम सूर्यनमस्कार' -    हा एक सर्वांगसुंदर व्यायाम आणि शारीरिक मानसिक   विकास घडविणारा शास्त्रशुद्ध प्रकार आहे. सामर्थ्य व दीर्घायुष्य संपादन करण्याचा हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. ह्यालाच 'सूर्योपासना' वा 'बलोपासना' असे नामाभिधान आहे.  यांत अशा दहा वेगवेगळ्या आसनांचा समावेश आहे की ज्यांच्यामुळे रक्तसंचालन उत्तम प्रकारे होऊन शरीरातील सर्व मांसपेशी, नाड्या व स्नायू पूर्णतया कार्यक्षम बनतात. तसेच ‘सूर्योपासना' ह्या शारीरिक तथा आध्यात्मिक तत्वाने ह्याचा अभ्यास केल्यास सूर्याच्या किरणांचा अमृततुल्य लाभ मिळतो.  रोगप्रतिबंधक शक्ति वाढून रोगनिवारणाची किमया साध्य होते. प्रत्येक स्त्री-पुरुष, बालके, तरुण, प्रौढ, वयोवृद्ध व्यक्ती, मग ते कोणत्याही धर्माचे वा जातीचे असोत, सर्वांसाठीच ते एक वरदान आहे.    सूर्याची बारा नावे  -  “नमः” ह्या प्रत्ययासहित पुढील प्रमाणे आहेत- १) मित्राय नमः । २) रवये नमः | ३) सूर्याय नमः । ४) भानवे नमः । ५) खगाय नमः । ६) पूष्णे नमः । ७) हिरण्यगर्भाय नमः । ८) मरीचये नमः । ९) आद...

yoga Information जाणून घ्या योगा विषयी

इमेज
  वास्तविक योग रोग-प्रतिबंधक आहे, रोग निवारक नाही. परंतु अनुभवाने असे सिद्ध झाले आहे की, किरकोळ स्वरुपाचे आणि प्रारंभिक अवस्थेतील काही रोग जसे सर्दी, खोकला, कफाचे सर्व विकार, मलावरोध आदी तक्रारी योगातील प्राथमिक शुद्धिक्रियांनीच नाहीसे होऊ शकतात.  तसेच काही असाध्य असलेले जटील विकारही दूर होऊ शकतात. आमचे भारतीय योगी रोग-निवारणार्थ हठयोगाचा उपयोग करीत असत. आणि खरोखरच योगक्रियांचे योग्य आचरण करून अनुभवाने सहज रोग बरे करता येतात, असा आमचा पण अनुभव आहे.  वेळ, पैसा वाचविला जाऊन आयुरारोग्य वाढत असते. ज्यांनी जीवनाची आशा सोडली आहे, आता आत्महत्या केलेली बरी असा दुःखाचा सुस्कारा टाकीत शेवटचा इलाज म्हणून योगाचा सहारा घेणाऱ्या कितीतरी महाभागांना या योगामुळे जीवदान मिळालेले आहे. जेथे इतर सर्व इलाज करून मनुष्य थकतो, बेजार होतो तेथे योगाच्या क्रियांनी आश्चर्यकारक लाभ होतोच होतो.  अनेक वर्षांचे जुने विकारही शेवटी योगिक उपचारांनी आणि प्राथमिक आयुर्वेदाचे साहाय्याने बरे होऊ शकतात. मात्र काही विकार, जसे अकार्यक्षम झालेले अवयव, हृदयाची व फुफ्फुसांची असाध्य सूज किंवा शस्त्रक्रिया करण्या...

डेंग्यू विषयी माहिती...

इमेज
प्रस्तावना:- समाजामध्ये अनेक आजाराच्या समस्या आहेत. त्यापैकीच एक असलेली समस्या म्हणजे डेंग्यू होय. आपला समाज अनेक वर्षापासून या आजारांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण तरीही दरवर्षी अनेक जन या आजारांना बळी पडत आहेत. याचे कारण आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून आपल्या घरात आणि परिसरात डेंग्यू आजार प्रसार करणारे डास उत्पत्ती होणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेतली तर डेंग्यू रुग्णाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे सहज शक्य आहे.  डेंग्यू  आजाराविषयी - डेंग्यू ताप हा आजार डेंग्यू विषाणूमुळे ( अर्बोव्हायरस ) होणारा विषाणूजन्य आजार आहे. डेंग्यूच्या विषाणूचे चार प्रकार डेंग्यू-1, डेंग्यू- 2, डेंग्यू- 3, डेंग्यू-  4 असे आहेत. डेंग्यू तापाचा प्रसार रुग्ण व्यक्ती पासून निरोगी व्यक्तीला ' एडिस इजिप्ती'  डासाच्या चावण्याने होतो.  डेंग्यू विषाणूची वाढ डासांमध्ये साधारणपणे आठ ते दहा दिवसात पूर्ण होते. हा विषाणू युक्त डास मरेपर्यंत  दूषित राहून अनेक व्यक्तींना डेंगीचा प्रसार करू शकतो. या डासाच्या पायावर पांढरे पट्टे असतात म्हणून त्यांना ' टायगर  मॉस...

नेत्रदान... एक श्रेष्ठ दान!

इमेज
तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमचे डोळे दिल्यामुळे दुसऱ्याला दिसायला मदत होऊ शकते, ही खरोखरच दयाळू गोष्ट आहे. आपण आपले कान, नाक, डोळे, हात आणि पाय यासारख्या आपल्या शरीराच्या अवयवांची चांगली काळजी घेतो जेणेकरून आपण जीवनातील कोणत्याही समस्या हाताळू शकतो. काही लोकांच्या शरीराचे काही अवयव नसतात, म्हणून डॉक्टरांनी त्यांना मदत करण्यासाठी अवयवदानाची कल्पना सुचली. सभोवतालचे जग पाहण्यासाठी आपले डोळे महत्त्वाचे आहेत. दुर्दैवाने, काही लोक जन्मतःच आंधळे असतात किंवा अपघातांमुळे आंधळे होतात आणि त्यांना दिसू शकत नाही. पण आता नेत्रदान करून डॉक्टर त्यांना पुन्हा दिसू शकतील. ही खरोखरच मोठी गोष्ट आहे जी लोक इतरांना मदत करण्यासाठी करतात. असे अनेक गट आणि संस्था आहेत जे मरण पावलेल्या लोकांकडून डोळे गोळा करून पाहू शकत नसलेल्या लोकांना मदत करू इच्छितात. लोकांना त्यांचे डोळे दान करण्याचे महत्त्व शिकवण्यासाठी त्यांच्याकडे विशेष कार्यक्रम आहेत. दरवर्षी एक दिवस, जागतिक नेत्रदान दिवस, लोकांना त्यांचे नेत्रदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी समर्पित आहे. यामध्ये मदत करणारे खास डॉक्टर्सही आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू...

आरोग्यासाठी नियम: Health Tips

१. या देहरुपी देवालयाचे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य असे तीन महत्वाचे आधारस्तंभ आहेत. २. आहार शक्यतो सात्विक, हलका व पाचक असावा, मसालायुक्त तळलेले पदार्थ,अति तिखट यांचे सेवन टाळावे. ३.जेवताना पाणी कमी प्या आणि जेवल्यानंतर अर्ध्या तासांनी पाणी पिऊ शकता. दात मिटून पाण्याची चव घेत पाणी प्यायलेले चांगले. ४. कमी खावे, खूप चावावे म्हणजे शिळी भाकरीपण पचत असते. पोटाचे दोन भाग अन्नासाठी, एक भाग पाण्यासाठी व एक भाग हवेसाठी असावा. ५. रात्रीचा आहार अल्पच घ्यावा.  रात्री १० च्या पुढे जागू नये व सकाळी ५ च्या पुढे झोपू नये. आरोग्यासाठी ७ तासांची झोप पुरे आहे. ६. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपता कामा नये. साधारण एक तासाच्या अंतराने झोपावे. रात्री आंबट पदार्थ सेवन वर्ज्य समजावे. ७. झोपताना शक्यतो डाव्या कुशीवर झोपले पाहिजे. त्यामुळे सूर्य नाडीचा प्रवाह चालू राहून रात्रीचे अन्न पचण्यास मदत होते. पण अधूनमधून डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर झोपण्यास हरकत नाही. ८. झोपण्याआधी थंड पाण्याने हात, पाय, तोंड धुऊन व 'नेत्र स्नान' घेऊन झोपावे. झोप शांत लागेल. स्वप्नदोष टळतील. ९. पालथे झोपण्याची सवय ...

केसांचे सौंदर्य वाढवायचे आहे? तर अशी घ्या काळजी.

इमेज
1. पोट साफ न झाल्याने केस गळती होऊ शकते. 2. शरीरात उष्णता वाढल्याने देखील केस गळती होते व त्यामुळे केस कोरडे व वृक्ष बनतात. 3. केस धुतल्यानंतर ते टॉवेलने जोर जोरा ने घासल्याने केसांची मुळे कमजोर होतात. 4. केसांचा गुंता काढताना मोठ्या दाताचा कंगवा वापरा. 5. धूम्रपानामुळे डोक्याकडे जाणारा रक्त प्रवाह कमी होतो त्यामुळे धूम्रपान करू नये. 6. आठवड्यातून दोन वेळा केस धुवा व त्यांची निगा राखा, धूळ प्रदूषणापासून संरक्षण करा. 7. केस धुण्यासाठी एलोवेरा, शिकाकाई, आवळा पावडर, रिटा, इत्यादी यांचा वापर करा. 8. ताण तणाव घेऊ नका, राग राग चिडचिड करू नका, प्रसन्न रहा. 9. विटामिन B12, विटामिन D, झिंक आणि आयर्नच्या कमतरतेमुळे केस गळतात. 10. रक्तातील हिमोग्लोब किंवा आयर्न डेफिसिएनसी झाल्याने  केस गळती होते.  11. केमिकल युक्त डाय च्या ऐवजी हर्बल मेहंदी चा वापर करावा. 12. हेअर स्ट्रेटनर, हेअर ड्रायर, इत्यादींचा वापर कमी करावा. 13. केसांच्या मुळांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी लोनअनुलोम योग प्राणायाम करावा. 14. केस ताणून बांधू नये. 15. हेअर स्टाईल करण्याकरिता जेल,लोशन इत्यादींचा वापर के...

HSC Result 2023:बारावी परीक्षेचा निकाल

इमेज
HSC Result 2023   राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल दिनांक 25 मे रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाइन जाहीर होणार. या वेबसाईटवर पहा:  1.  http://hscresult.mkcl.org 2.  http://mahresult.nic.in

यशस्वी होण्याचा मार्ग: Here is the path to success

इमेज
  यशस्वी होण्याचा मार्ग:  Here is the path to success          एकेकाळी एक धष्टपुष्ट तरुण होता. तो बेरोजगार होता ही त्याची मोठी अडचण होती. तो एकदा एका वनराईतून जात असताना त्याला त्या वनराईचा व्यवस्थापक भेटला आणि त्याने त्याला काम करण्याची संधी दिली आणि एक कु-हाड दिली. झाडे तोडण्याचे काम या तरुणाने मोठ्या जोमाने व उत्साहाने सुरू केले.. त्याच दिवशी त्याने सात मोठी झाडे तोडली. दुस-या दिवशी त्याच उत्साहाने, जोमाने व त्याच कु-हाडीने त्याने कामास सुरुवात केली. दुस-या दिवशी त्याला सहा मोठी झाडे तोडता आली. तिस-या दिवशी त्याच जोमाने, उत्साहाने व तेवढाच वेळ काम करूनही त्याला पांच मोठी झाडे तोडता आली. सातव्या दिवशी या वनराईचा व्यवस्थापक जेव्हा वनराईत कामावर देखरेख करत फिरत होता तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा तरुण आपला घाम पुसत होता, सकाळपासून त्याचे एकही झाड तोडण्याचे काम पूर्ण झालेले नव्हते .                हे पाहून वनराईचा हा साहेब म्हणाला, अरे तरुणा, तुझे काम दिवसेदिवस कमी का होत आहे? तो तरुण उत्तरला, साहेब, मी त्याच जो...

Dietary Oil consumption and Health:आहारातील तेलाचा वापर आणि आरोग्य

इमेज
Dietary Oil consumption and Health. आहारातील तेलाचा वापर आणि आरोग्य स्निग्ध पदार्थाचा आहारातील समावेश आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतो. तेलामुळे अन्नाची चव वाढते.   याशिवाय A, D, E, K या   जीवनसत्त्वाच्या शोषण करता ते गरजेची असतात म्हणून त्यांचा आहारातील समावेश योग्य प्रमाणात असणे खूपच आवश्यक असते. प्रौढाच्या तेलाच्या गरजा कमी असल्या तरी लहान मुलांची त्यांच्या शरीराच्या प्रती किलोग्रॅम वजनास उष्मांकाची गरज जास्त असल्याने व एका वेळी   ती अधिक कर्बोदक युक्त आहार खावू शकत नसल्यामुळे त्याच्या आहारात अधिक तेलांचा समावेश करणे आवश्यक असते. तेलबियांपासून मिळणारी तेले तसेच प्राणीजन्य पदार्थातील स्निग्धे असे आहारातील स्निग्धाचे स्त्रोत असतात. बहुतांश अन्नपदार्थात अदृष्य स्वरुपात तेले असतात. तेलबियामधून काढलेली तेले , तूप ही दृष्य तेले आहेत. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थामधील तेलांना छुपी तेले म्हणतात , तृणधान्ये कडधान्ये यांत थोड्या प्रमाणात अदृष्य स्वरूपात तेले असतात. परंतु बहुतांश प्राणीज पदार्थात हे प्रमाण लक्षणीय असते. दृष्य , अदृष्य किंवा छुपी तेले यामधून आपल्या द...

रक्तदाब ( Blood pressure)

इमेज
    रक्तदाब  पेशंट करीता आहार:-   * आहारात मीठाचे प्रमाण कमीत कमी ठेवावे. दिवसभरात २ ते ५ ग्रॅम मिठाचा वापर करावा.पापड, लोणची, मसाले, खारवलेले पदार्थ खाऊ नयेत.  * स्वयंपाकात मिठाचा वापर कमी करावा. पदार्थ शिजत आल्यावर मीठ टाकावे.जेवणात वरुन मीठ घेऊ नये. * बेकींग पावडर, खाण्याचा सोडा असलेले पदार्थ खाऊ नयेत. विकतचे शेव, फरसाण, भजे, समोसे इत्यादी टाळावेत उदा. बेकरी प्रॉडक्ट, * खारट पदार्थ, वेफर्स, सॉस, चीझ, बटर, फ्रोझन मटार, खारवलेले मासे, डबाबंद व मसालेदार पदार्थ टाळावेत. न्यूट्रालाइट बटरचा वापर करू शकता. * आपले वजन योग्य प्रमाणात ठेवावे. तळलेले पदार्थ शक्यतो टाळावेत. • पालेभाज्या, ताजी फळे, मोड आलेली / अंकुर आलेली कडधान्ये, कोशिंबीरी यांचा आहारात समावेश असावा. अंडी व चरबीयुक्त मांसाहार मर्यादित असावा. * कॅल्शिअम व पोटॅशिअम असलेल्या पदार्थाचा समोवश जास्त प्रमाणात करावा. उदा. नाचणी, तीळ, दुध, गाजर, मुळा, संत्री, कलिंगड, चिक्कू, कोको, कॉफी इ. * योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा शक्य असल्यास करावे.. * उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांस याचा फायदा होतो. * दररोज ४५ मिनिट ...

हृदयविकार :Heart Disease

इमेज
 हृदयविकार :Heart Disease    हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक हा जगातील सर्व सामान्य आजारांपैकी एक आहे. वेळेवर लक्ष न दिल्याने हृदयविकाराचा झटका सर्व सामान्य रुग्णांसाठी जीवघेणी ठरतो.आपल्या सर्वांना हृदयविकारांबाबतची माहिती असलीच पाहिजे कारण हा आजार सर्वसामान्य आहे तुम्ही आज ऐकलेली ही माहिती उद्या कोणाचा तरी जीव वाचवू शकेल. ह्रदयविकार रुग्णांसाठी आहार विषयी माहिती:-   * योग्य व्यायाम सहित जेवण कमी करण्याचा सर्वात योग्य मार्ग होय. * दरवेळी पोटात भूक कायम राहील अशा पद्धतीने जेवण घ्यावे.  * गोड, तळीव पदार्थ, तूप वर्ज्य, भात, बटाटे, शेंगदाणे, खोबरं, नारळ त्यांचे सेवन कमी प्रमाणात करावे.  * गाजर, टोमॅटो, कांदे, दोडका, पालक, मेथी व पालेभाज्या भरपूर प्रमाणात घेऊ शकता. * फोडणीत तेलाचे प्रमाण अत्यंत कमी असावे. हृदयविकार असणात्यांनी करडीचे तेल (किंवा सफोला) वापरणे योग्य ठरेल. * एकवेळ जेवण केल्याने व दिवसभर उपवास केल्याने वजन कमी न होता उलट वाढते.. *त्यामुळे तीन वेळा कमी प्रमाणांत जेवण करावे व एकाच वेळी पोटभर जेवल्याने वजन कमी होत नाही. दररोज सकाळी किंवा सायंकाळी ...

जाणून घ्या मधुमेह संबंधी माहिती: Diabetes

इमेज
मधुमेह (Diabetes) लक्षणे:-   मधुमेहाची आपल्याला प्रत्येक वेळी लक्षणे दिसून येतीलच असे नाही कारण तो आपल्या शरीरात छुप्या स्वरूपात असू शकतो. मधुमेहाची लक्षणे असल्यास रक्तातील साखरेची चाचणी करून मधुमेह आहे की नाही आपण ओळखू शकतो. • वारंवार लघवीला जावे लागणे,  • वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे, • अचानकपणे वजन घटणे, • अशक्तपणा, चक्कर येणे, • अधिक भूक लागणे, • हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे, • डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे, • मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे, • जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे, • मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात. घ्यावयाची काळजी:-  * डायबिटीस आहे हे विसरून आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. * आपल्या सोबत नेहमी खडीसाखर  ठेवा चक्कर आली असता वेळीच घ्या. * दिवसभरात कमीत कमी १०-१२ ग्लास पाणी प्यावे. * जेवणानंतर कमीत कमी दहा मिनिटे चालणे, उपाशी पोटी चालू नये. * पायाची खास करुन काळजी घ्यावी. बरोबर मापाचे बुट, चप्पल वापरा व जखम होणार नाही याची काळजी घ्या. * सोयाबीन चंक्स किंवा वडी भाजीमध्ये वापरा किंवा पाव किलो वडी...

हसण्याचे फायदे- (Benefits of Laughter)

इमेज
  हसण्याचे फायदे- (Benefits of Laughter) 😅😆😆😇 मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखाद्या परिचित/ अपरिचित व्यक्ती भेटतात तेव्हा स्मित हास्य देऊन बोलण्यात सुरुवात करा. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला चांगले प्रसन्न वाटून सुसंवाद  दोघांमध्ये होण्यास मदत होते. तसेच दिवसात अनेक वेळा हसणे  मानसिक आणि शारीरिक विकासासाठी हसणे खूप फायदेशीर आहे. हसण्यामुळे वेदना कमी होतात.  तसेच शरीरातील स्नायूचा ताण कमी होतो.  हसण्यामुळे अवयव उत्तेजित होतात.  हसल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले राहते ज्यामुळे तुम्ही ह्रदयविकार टाळू शकतात.  हसण्यामुळे आपला मूड देखील चांगला राहतो.  थोड्या वेळासाठी का होईना पण आपण त्या तणावातून बाहेर येतो आपलं दुःख विसरतो. हसणे मानसिक समस्यांना तोंड देण्यास आणि तुमच्या स्वाभिमान सुधारण्यास मदत करते.  तुम्ही दिवसातून दहा ते पंधरा मिनिटे  दररोज  या ना त्या कारणाने हसण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे निरोगी आरोग्य राहण्यास मदत होते.  चांगली झोप येते रात्री झोप येत नसेल तर त्याचे उपचार हसण्यात दडले...

आयोडीनयुक्त मिठाचे महत्व (Importance of iodized salt)

इमेज
  आयोडीनयुक्त मिठाचे महत्व -   मानवी शरीरासाठी रोजची लागणारी आयोडीनची सर्वसाधारण मात्रा प्रौढ व्यक्तीस दररोज सरासरी 150 मायक्रोग्रम व गरोदर तसेच स्तनपान देणाऱ्या महिलेस दररोज सरासरी 200 मायक्रोग्रम एवढी आयोडीनची आवश्यकता असते.  आयोडीन कमतरतेमुळे  सौम्य किंवा अति गंभीर आजार होऊ शकतात. गलगंड हा आजार आयोडीन कमतरतेचे एक लक्षण आहे. या मध्ये थायरॉईड ग्रंथीची वाढ होते यालाच गलगंड असे म्हटले जाते. तसेच स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात व नवजात बालकांचे मृत्यू होतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे नवजात बाळामध्ये तिरळेपणा येतो, मेंदूची वाढ खुंटते, शारीरिक वाढ खुंटते, मूकबधिरपणा येतो, बुद्ध्यांकाची दहा ते पंधरा अंशाने घट होऊ शकते.  त्यामुळेच  समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी 21 आक्टोंबर हा दिवस जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.  आपली भावी पिढी मानसिक व शारीरिक दृष्ट्या भक्कम होण्यासाठी आहारामध्ये आयोडीन युक्त मीठाचाच वापर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.  मिठातील आयडीचे प्रमाण प्रयोगशाळेतील तपासणी व्यतिरिक्त MBI...

मानसिक शांती आरोग्यासाठी ( Mental peace for health )

इमेज
मानसिक शांती, आरोग्यासाठी....  हा लेख मनशांतीसाठी असल्यामुळे मन शांत ठेवूनच शांतपणे वाचावे घाईत वाचू नये.  मित्रांनो,  आजकालच्या धक्का धक्कीच्या जीवनात प्रत्येकाला मनशांती शोधावी लागत आहे. धावपळ,दगदग,प्रवास,कलह, स्पर्धा वाढत आहेत. मनशांती असेल तर सर्व संकटावर आपण मात करून आरोग्यदायी जीवन जगू शकतो.  ⚈ मानसिक शांतीसाठी हे उपाय नक्कीच उपयोगी येतील- 1. मानसिक आरोग्य चांगले होण्यासाठी रोज व्यायाम, योगासने, ध्यान  धारणा  करणे आवश्यक आहे.  2. ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टी मनात घोळत बसू नका. त्या ऐवजी सोडून द्यायला शिका.  3. स्वतःची तुलना इतरांशी कधीच करू नका.  4. नेहमी डोळ्यासमोर आपण एका शांत निसर्ग रम्य वातावरणात आहोत अशाच जाणिवेने श्वासोश्वास घ्या व अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणाची स्वप्ने पहा.   5. काम करत असताना थोडासा आराम करायला जर तुम्ही वेळ काढला तर आंतरिक तणाव आपोआपच कमी होईल.  6. आपल्या जवळच असणाऱ्या आवडीच्या पर्यटन स्थळांना भेटी द्या.  7. शांत वातावरणात तीन वेळा म्हणा मी माझे ध्येय प्राप्त करणार आहे यावर माझा विश्वास आह...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

इमेज
  31 May  World No - Tobacco day ज़िन्दगी चुनो ,     तम्बाकू नहीं . तंबाखू काय आहे ? तंबाखूमध्ये निकोटीन असते , जी तंबाखूची सवय लागताना मुख्य घटक असते. त्यामुळे तंबाखूवरील व्यक्तिचे शारिरीक आणि मानसिक अवलंबित्व वाढते. निकोटीन हे विषारी रसायन असून एक वेळ सामान्य मनुष्यालाही मारू शकते. निकोटीन व्यतिरीक्त तंबाखूमध्ये ४ , ००० पेक्षा जास्त विषारी रसायने असतात. तंबाखू विषयी अधिक माहिती - तंबाखूमध्ये असणारे अल्कोलाइड रसायन कोटीनाईड , अँ न्टीबीन , अनाबेसीन , अँ लीकटीक , हायड्रोकार्बन इ रसानामुळे तंबाखुला चव येते. तंबाखुमध्ये असणारे फायटिस्टेरॉल रसायान: कोलेस्ट्रॉल , कॅम्पेस्टेल , क्लोरिजेनिक  अँ सिड , रुटीन , सेव्हरल फ्री अमिनो  अँ सिड  इत्यादी. भारतीय तंबाखूमध्ये मयुरी , लेड , कॅडमियन , क्रोमियम इत्यादी अति विषारी रसायन आढळतात. तंबाखू सेवनाचे विविध प्रकार- १) विडी    २) सिगरेट    ३) सिगार     ४) चिरुट   ५) चुटटा   ६) धूमती   ७) पाइप         ८) हकली  ९) चिलीम    १०) ...