मानसिक शांती आरोग्यासाठी ( Mental peace for health )
मानसिक शांती, आरोग्यासाठी....
हा लेख मनशांतीसाठी असल्यामुळे मन शांत ठेवूनच शांतपणे वाचावे घाईत वाचू नये.
मित्रांनो, आजकालच्या धक्का धक्कीच्या जीवनात प्रत्येकाला मनशांती शोधावी लागत आहे. धावपळ,दगदग,प्रवास,कलह, स्पर्धा वाढत आहेत. मनशांती असेल तर सर्व संकटावर आपण मात करून आरोग्यदायी जीवन जगू शकतो.
⚈ मानसिक शांतीसाठी हे उपाय नक्कीच उपयोगी येतील-
1. मानसिक आरोग्य चांगले होण्यासाठी रोज व्यायाम, योगासने, ध्यान धारणा करणे आवश्यक आहे.
2. ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टी मनात घोळत बसू नका. त्या ऐवजी सोडून द्यायला शिका.
3. स्वतःची तुलना इतरांशी कधीच करू नका.
4. नेहमी डोळ्यासमोर आपण एका शांत निसर्ग रम्य वातावरणात आहोत अशाच जाणिवेने श्वासोश्वास घ्या व अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणाची स्वप्ने पहा.
5. काम करत असताना थोडासा आराम करायला जर तुम्ही वेळ काढला तर आंतरिक तणाव आपोआपच कमी होईल.
6. आपल्या जवळच असणाऱ्या आवडीच्या पर्यटन स्थळांना भेटी द्या.
7. शांत वातावरणात तीन वेळा म्हणा मी माझे ध्येय प्राप्त करणार आहे यावर माझा विश्वास आहे.
8. मी सफल होणार हे वाक्य स्तब्ध शांततेत आत्मविश्वासाने तीन वेळा म्हणावे.
9. शांत व पवित्र वातावरणात राहून आपले ध्येय जे ठरवलेले आहे, त्याचे सतत ध्यान करावे. हे ध्यान जोपर्यंत आपली मानसिक शक्ती ऊर्जा रूप घेत नाही. तो पर्यंत करावे.
10. शांत वातावरण शोधा त्याची सुंदरता जाणा. त्या सुंदर जाणीवेने समाधान, तृप्ती मिळेल. अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे मानसिक शांती मिळू शकते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा