यशस्वी होण्याचा मार्ग: Here is the path to success

 यशस्वी होण्याचा मार्ग:  Here is the path to success 

       एकेकाळी एक धष्टपुष्ट तरुण होता. तो बेरोजगार होता ही त्याची मोठी अडचण होती. तो एकदा एका वनराईतून जात असताना त्याला त्या वनराईचा व्यवस्थापक भेटला आणि त्याने त्याला काम करण्याची संधी दिली आणि एक कु-हाड दिली. झाडे तोडण्याचे काम या तरुणाने मोठ्या जोमाने व उत्साहाने सुरू केले.. त्याच दिवशी त्याने सात मोठी झाडे तोडली. दुस-या दिवशी त्याच उत्साहाने, जोमाने व त्याच कु-हाडीने त्याने कामास सुरुवात केली. दुस-या दिवशी त्याला सहा मोठी झाडे तोडता आली. तिस-या दिवशी त्याच जोमाने, उत्साहाने व तेवढाच वेळ काम करूनही त्याला पांच मोठी झाडे तोडता आली. सातव्या दिवशी या वनराईचा व्यवस्थापक जेव्हा वनराईत कामावर देखरेख करत फिरत होता तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा तरुण आपला घाम पुसत होता, सकाळपासून त्याचे एकही झाड तोडण्याचे काम पूर्ण झालेले नव्हते.

               हे पाहून वनराईचा हा साहेब म्हणाला, अरे तरुणा, तुझे काम दिवसेदिवस कमी का होत आहे? तो तरुण उत्तरला, साहेब, मी त्याच जोमाने, उत्साहाने, कु-हाडीने आणि तेवढाच वेळ काम करीत आहे. पण माझ्या हातून काम मात्र रोज कमीकमी होत आहे.  साहेब हसला आणि त्याने विचारले, तू तुझ्या कु-हाडीला धार लावण्यासाठी कामातून वेळ काढला होतास काय? तो तरुण म्हणाला, मी कामात इतका मग्न होतो की, मी तसं काही केले नाही. त्या तरुणाकडे टक लावून पहात वनराईचा तो व्यवस्थापक म्हणाला, मेहनतीने काम करणे हे महत्त्वाचे आहेच, पण ताजेतवानेपणे काम करणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

              मी आपणा सर्वांना विचारतो, तुम्ही खूप मेहनत करता की, ताजेतवानेपणे काम करता ? तुम्ही आपल्या कु-हाडीला नियिमतपणे धार लावता काय ?

आता पाहू आपण आपल्या आयुष्यात कुठल्या कु-हाडी वापरतो

१. शरीर.

२. मन.

आपण आपल्या या कु-हाडींना रोज धार लावण्याची सवय लावली तर आपण ताजेतवानेपणे काम करू शकता.

शरीर (कु-हाड) :- 

आपण आपल्या शरीराच्या खालील ताकदींचा नियमित वापर करतो.

१. शारीरिक शक्ती

२. दम वा जोम

३. प्रतिक्षिप्त क्रिया (चपळ हालचाली)


 शरीररुपी या कु-हाडीला धारदार करण्यासाठी म्हणजे ताजेतवाने होण्यासाठी काय कराल ? 

→ सकस अन्न खा.

→ नियमित व्यायाम करा.

→ पुरेशी विश्रांती घ्या.


 मन ( कु-हाड)  :

आपण आपल्या मनाच्या खालील ताकदीचा नियमित वापर करतो.

१. ज्ञान

२. कौशल्य

३. वृत्ती


 आपल्या मनरुपी कु-हाडीला धारदार करण्यासाठी म्हणजे ताजेतवाने करण्यासाठी काय कराल ? 

→ सकारात्मक वृत्ती वृद्धिंगत करा.

→ प्रेरणादायक पुस्तकांचे वाचन करा.

→ नियमित स्वस्थता प्राप्त करण्याची संवय लावा.

→ व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमात सहभागी व्हा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024