हसण्याचे फायदे- (Benefits of Laughter)

 



हसण्याचे फायदे- (Benefits of Laughter) 😅😆😆😇

मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखाद्या परिचित/ अपरिचित व्यक्ती भेटतात तेव्हा स्मित हास्य देऊन बोलण्यात सुरुवात करा.

त्यामुळे समोरच्या व्यक्तीला चांगले प्रसन्न वाटून सुसंवाद  दोघांमध्ये होण्यास मदत होते. तसेच दिवसात अनेक वेळा हसणे  मानसिक आणि शारीरिक विकासासाठी हसणे खूप फायदेशीर आहे.

  • हसण्यामुळे वेदना कमी होतात. 
  • तसेच शरीरातील स्नायूचा ताण कमी होतो. 
  • हसण्यामुळे अवयव उत्तेजित होतात. 
  • हसल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले राहते ज्यामुळे तुम्ही ह्रदयविकार टाळू शकतात. 
  • हसण्यामुळे आपला मूड देखील चांगला राहतो. 
  • थोड्या वेळासाठी का होईना पण आपण त्या तणावातून बाहेर येतो आपलं दुःख विसरतो.
  • हसणे मानसिक समस्यांना तोंड देण्यास आणि तुमच्या स्वाभिमान सुधारण्यास मदत करते. 
  • तुम्ही दिवसातून दहा ते पंधरा मिनिटे  दररोज  या ना त्या कारणाने हसण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे निरोगी आरोग्य राहण्यास मदत होते. 
  • चांगली झोप येते रात्री झोप येत नसेल तर त्याचे उपचार हसण्यात दडलेले आहेत जेव्हाही तुम्हाला रात्री झोप येत नाही तेव्हा झोपण्यापूर्वी एखादा कॉमेडी सिनेमा किंवा पुस्तक वाचा यामुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.
  • हसण्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते हेही अनेक अभ्यासातून समोर आले आहे. 
  • हसण्यामुळे  अँटिबायोटिक  तयार करणाऱ्या पेशींची संख्या वाढते. ज्यामुळे वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते. 

त्यामुळेच माणसाने स्वतः हसावे व इतरांना हसवत राहावे अशा हास्य विनोदामुळे तुमच्या आसपासचे वातावरण  आनंदी, प्रसन्न राहण्यास मदत होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024