DIET TO PREVENT HEART DISEASE / हृदयविकार टाळण्यासाठी आहार
DI
ET TO PREVENT HEART DISEASE: हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा.DI
जाणून घ्या लक्षणे आणि उपाय,आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरावर मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. जेवणाची, झोपण्याची वेळ चुकत असल्याने त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. त्यामुळे आजकालच्या तरुणाईला विविध रोगांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय वाढत्या प्रदूषणामुळे आपले शरीर कमकुवत होत चालले आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच हृदयविकाराचा त्रास संभवत आहे. आधीच्या काळात हृदयविकार हा आजार वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र आता हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होत आहे.
WHO आणि अमेरिकन जर्नलच्या अभ्यासानुसार, 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयाच्या समस्यांमध्ये 13 टक्के वाढ झाली असल्याचे म्हणले आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठा आजार हृदयविकार हा झाला आहे. अहवालानुसार गेल्या तीन दशकांत भारत देशात हृदयविकाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अगदी दुप्पट झाले आहे. त्यामुळे हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी आपल्या जेवणात विविध पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. तर आज आपण जाणून घेऊयात हृदयविकार टाळण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे… (Health Tips to Avoid Heart Attack)
एवोकॅडो : शरीर निरोगी राहण्यासाठी योग्य आहार करणे गरजेचं आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेता आहारात एवोकॅडो या फळाचा आवर्जून समावेश करा.
अक्रोड : हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी दररोज आहारात ड्राय फ्रुटीला समावेश करणे महत्वाचं आहे. त्या ड्राय फ्रुटसपैकी आहारात अक्रोडचा समावेश आवर्जून करा. अक्रोड हे आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे. अक्रोडामध्ये मॅग्नेशियम, तांबे आणि मॅंगनीज यांसारखे फायबरयुक्त घटक आहेत. संशोधनात असे उघडकीस झाले आहे की, अक्रोडाचे सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच अक्रोडचे सेवन केल्यास मधुमेह, रक्तदाब, सूज कमी होणे, चरबी कमी होणे यासारखे आजार कमी होतात. अक्रोडमध्ये लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारखे पोषक तत्व आहेत. अक्रोडाचे सेवन करताना दिवसाला किमान 2 ते 3 अक्रोड खावे. सर्वात महत्वाचं म्हणजे जास्त प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात हे लक्षात घ्यावे.
डार्क चॉकलेट : आजकाल लहानमुलांना डार्क चॉकलेट खायला जास्त प्रमाणात आवडते. मात्र डार्क चॉकलेट खाण्याचा शरीरावर चांगला फायदा होत आहे. डार्क चॉकलेट खाल्ल्याने स्ट्रेस कमी होतो. यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो. मात्र चॉकलेटचे सेवन करताना प्रमाण कमी केले पाहिजेत. कमी प्रमाणात चॉकलेट खाल्ल्याने हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. याशिवाय उच्च रक्तदाबाची समस्या कमी करण्यासाठीही डार्क चॉकलेट खाणे फायदेशीर ठरू शकते. महत्वाचं म्हणजे डार्क चॉकलेट हे एक अँटी-ऑक्सीडेंटचा उत्तम स्त्रोत आहे. चॉकलेटचे सेवन केल्यास मेंदूचे कार्य सुधारते. तसेच कोकोयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो. चॉकलेटमध्ये बायोॲक्टिव्ह कंपाऊंड असतात. या घटकांमुळे त्वचा चांगली होते. त्यामुळे आहारात डार्क चॉकलेटचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पालेभाज्या : कित्येक रोगांचा सामना करण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. हिरव्या भाज्यांमध्ये मुभलग प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असल्याने ते शरीरासाठी फायदेशीर असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक आणि बीन्स यांसारख्या भाज्यांचे सेवन केल्याने आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. हिरव्या भाज्यांच्या आहारात समावेश केल्याने रक्तवाहिन्यांचे संरक्षण होते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. पालेभाज्यांमध्ये विविध प्रकारचे खनिज तसेच काही प्रमाणात एन्झाइम्स असतात. हृदयरोहाचा सामना करण्यासाठी आहारात पालक, मेथी, शेपू, चुका, कोथिंबीर, करडई, तांदुळजा, राजगिरा यांसारख्या भाज्यांचा समावेश करा.
हृदयरोगाचे लक्षणे :
1) छातीत दुखणे.
2) विनाकारण जास्त प्रमाणात घाम येणे.
3) श्वास घेण्यास त्रास होणे.
4) उलटी चक्कर येणे.
5) पाय सुजणे
6) मान व तोंडाचा जबडा दुखणे.
हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी या उपाय योजना करणे ठरू शकते फायदेशीर! :
1) हृदयरोगाचा सामना करण्यासाठी रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवणे महत्वाचं आहे.
2) दररोज कमीत कमी 30 मिनिट नियमित व्यायाम करा.
3) शक्यतो निरोगी हृदय ठेवण्यासाठी फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळा आणि निरोगी आहाराचे सेवन करा.
4) सर्वात महत्वाची बाब म्हणजे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मद्यपान, धूम्रपान, तणाव पातळी नियंत्रित करा.
5) दररोज कमीत कमी दोन लीटर पाणी प्या.
6) आरोग्याची काळजी घेण्यासाठी दररोज गोड पदार्थांचे अतिरिक्त सेवन टाळा.
7) चांगल्या आरोग्यासाठी किमान 7 तास झोप महत्वाची आहे. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 7 तास झोप नक्की घ्या.
8) मसाल्याचे पदार्थ खाणे टाळा.
टीप : आरोग्यविषयीची ही माहिती फक्त वाचकांसाठी असून याबाबतची कोणतीही खात्री लेखक घेत नाही. तसेच यासंदर्भात दिलेली माहिती आमलात आणताना डॉक्टरांच्या सल्ला आवश्य घ्या

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा