yoga Information जाणून घ्या योगा विषयी
वास्तविक योग रोग-प्रतिबंधक आहे, रोग निवारक नाही. परंतु अनुभवाने असे सिद्ध झाले आहे की, किरकोळ स्वरुपाचे आणि प्रारंभिक अवस्थेतील काही रोग जसे सर्दी, खोकला, कफाचे सर्व विकार, मलावरोध आदी तक्रारी योगातील प्राथमिक शुद्धिक्रियांनीच नाहीसे होऊ शकतात.
तसेच काही असाध्य असलेले जटील विकारही दूर होऊ शकतात. आमचे भारतीय योगी रोग-निवारणार्थ हठयोगाचा उपयोग करीत असत. आणि खरोखरच योगक्रियांचे योग्य आचरण करून अनुभवाने सहज रोग बरे करता येतात, असा आमचा पण अनुभव आहे.
वेळ, पैसा वाचविला जाऊन आयुरारोग्य वाढत असते. ज्यांनी जीवनाची आशा सोडली आहे, आता आत्महत्या केलेली बरी असा दुःखाचा सुस्कारा टाकीत शेवटचा इलाज म्हणून योगाचा सहारा घेणाऱ्या कितीतरी महाभागांना या योगामुळे जीवदान मिळालेले आहे. जेथे इतर सर्व इलाज करून मनुष्य थकतो, बेजार होतो तेथे योगाच्या क्रियांनी आश्चर्यकारक लाभ होतोच होतो.
अनेक वर्षांचे जुने विकारही शेवटी योगिक उपचारांनी आणि प्राथमिक आयुर्वेदाचे साहाय्याने बरे होऊ शकतात. मात्र काही विकार, जसे अकार्यक्षम झालेले अवयव, हृदयाची व फुफ्फुसांची असाध्य सूज किंवा शस्त्रक्रिया करण्यासारखे विकार हे सोडून बाकी सर्व शक्य होत आहे.
योगातील यम-नियमांचे पालन करणारा, औषधी वनस्पती आणि रोगाचे ज्ञान असलेला, निःस्वार्थबुद्धीने व आत्मीयतेने रोग बरे करण्याचा अनुभव असलेला, अशा गुणांचा समुच्चय ज्या व्यक्तीत आहे त्यालाच या औषधाने रोग बरे करण्याची “सिद्धी” लाभत असते.
आमच्या पूर्वजांनी भारतीयांना दिलेला “योग आणि आयुर्वेद" याचा अमृतमय साठा एक पवित्र 'वरदान' आहे. ते ज्ञान मिळविण्याची पात्रता आम्ही निर्माण केली पाहिजे.
योग म्हणजे प्राणायाम विद्या योगा दिनेश शरीर परिपक व पवित्र बनले जाऊन आंतरिक ईश्वरी शक्तीचा खजिना उघडला जातो चित्तावर ताबा मिळविण्यासाठी शास्त्राने दोन क्रम सांगितले आहे योग आणि ज्ञान योगाने चित्तावर ताबा मिळविला जातो व ज्ञानाने सत्याचा बोध होतो मन शांत होते.
ॐ शांतिः शांतिः शांतिः ।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा