हृदयविकार :Heart Disease
हृदयविकार :Heart Disease
हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक हा जगातील सर्व सामान्य आजारांपैकी एक आहे.वेळेवर लक्ष न दिल्याने हृदयविकाराचा झटका सर्व सामान्य रुग्णांसाठी जीवघेणी ठरतो.आपल्या सर्वांना हृदयविकारांबाबतची माहिती असलीच पाहिजे कारण हा आजार सर्वसामान्य आहे तुम्ही आज ऐकलेली ही माहिती उद्या कोणाचा तरी जीव वाचवू शकेल.
* योग्य व्यायाम सहित जेवण कमी करण्याचा सर्वात योग्य मार्ग होय.
* दरवेळी पोटात भूक कायम राहील अशा पद्धतीने जेवण घ्यावे.
* गोड, तळीव पदार्थ, तूप वर्ज्य, भात, बटाटे, शेंगदाणे, खोबरं, नारळ त्यांचे सेवन कमी प्रमाणात करावे.
* गाजर, टोमॅटो, कांदे, दोडका, पालक, मेथी व पालेभाज्या भरपूर प्रमाणात घेऊ शकता.
* फोडणीत तेलाचे प्रमाण अत्यंत कमी असावे. हृदयविकार असणात्यांनी करडीचे तेल (किंवा सफोला) वापरणे योग्य ठरेल.
* एकवेळ जेवण केल्याने व दिवसभर उपवास केल्याने वजन कमी न होता उलट वाढते..
*त्यामुळे तीन वेळा कमी प्रमाणांत जेवण करावे व एकाच वेळी पोटभर जेवल्याने वजन कमी होत नाही. दररोज सकाळी किंवा सायंकाळी किमान तीन किलोमीटर वेगाने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालण्याचा व्यायाम करावा.
* सकाळपासून सायंकाळपर्यंत काय खाल्ले याची नोंद ठेवावी व त्यातील कोणते पदार्थ घेणे चूकीचे आहे, याबद्दल योग्य व्यक्तीकडून / डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.
* पातळ ताक, एक कप साय काढलेल दूध, दोन वेळा चहा, पातळ डाळी, एक भाकरी किंवा दोन लहान पोळ्या, किमान दोन भाज्या, कोथिंबीर दरवेळच्या जेवणात घेण्यास हरकत नाही.
* वरील आहार पद्धतीचा व व्यायाम विषयक सल्ल्याचा अवलंब केल्याने वजन कमी होऊन पडणारा अनावश्यक ताण कमी होण्यास शक्य होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा