रक्तदाब ( Blood pressure)


   

रक्तदाब  पेशंट करीता आहार:-

 * आहारात मीठाचे प्रमाण कमीत कमी ठेवावे. दिवसभरात २ ते ५ ग्रॅम मिठाचा वापर करावा.पापड, लोणची, मसाले, खारवलेले पदार्थ खाऊ नयेत.

 * स्वयंपाकात मिठाचा वापर कमी करावा. पदार्थ शिजत आल्यावर मीठ टाकावे.जेवणात वरुन मीठ घेऊ नये.

* बेकींग पावडर, खाण्याचा सोडा असलेले पदार्थ खाऊ नयेत. विकतचे शेव, फरसाण, भजे, समोसे इत्यादी टाळावेत उदा. बेकरी प्रॉडक्ट, * खारट पदार्थ, वेफर्स, सॉस, चीझ, बटर, फ्रोझन मटार, खारवलेले मासे, डबाबंद व मसालेदार पदार्थ टाळावेत. न्यूट्रालाइट बटरचा वापर करू शकता.

* आपले वजन योग्य प्रमाणात ठेवावे. तळलेले पदार्थ शक्यतो टाळावेत.

• पालेभाज्या, ताजी फळे, मोड आलेली / अंकुर आलेली कडधान्ये, कोशिंबीरी यांचा आहारात समावेश असावा. अंडी व चरबीयुक्त मांसाहार मर्यादित असावा. * कॅल्शिअम व पोटॅशिअम असलेल्या पदार्थाचा समोवश जास्त प्रमाणात करावा. उदा. नाचणी, तीळ, दुध, गाजर, मुळा, संत्री, कलिंगड, चिक्कू, कोको, कॉफी इ.


* योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा शक्य असल्यास करावे.. * उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांस याचा फायदा होतो.


* दररोज ४५ मिनिट चालणे हितावह

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024