केसांचे सौंदर्य वाढवायचे आहे? तर अशी घ्या काळजी.
1. पोट साफ न झाल्याने केस गळती होऊ शकते.
2. शरीरात उष्णता वाढल्याने देखील केस गळती होते व त्यामुळे केस कोरडे व वृक्ष बनतात.
3. केस धुतल्यानंतर ते टॉवेलने जोर जोरा ने घासल्याने केसांची मुळे कमजोर होतात.
4. केसांचा गुंता काढताना मोठ्या दाताचा कंगवा वापरा.
5. धूम्रपानामुळे डोक्याकडे जाणारा रक्त प्रवाह कमी होतो त्यामुळे धूम्रपान करू नये.
6. आठवड्यातून दोन वेळा केस धुवा व त्यांची निगा राखा, धूळ प्रदूषणापासून संरक्षण करा.
7. केस धुण्यासाठी एलोवेरा, शिकाकाई, आवळा पावडर, रिटा, इत्यादी यांचा वापर करा.
8. ताण तणाव घेऊ नका, राग राग चिडचिड करू नका, प्रसन्न रहा.
9. विटामिन B12, विटामिन D, झिंक आणि आयर्नच्या कमतरतेमुळे केस गळतात.
10. रक्तातील हिमोग्लोब किंवा आयर्न डेफिसिएनसी झाल्याने केस गळती होते.
11. केमिकल युक्त डाय च्या ऐवजी हर्बल मेहंदी चा वापर करावा.
12. हेअर स्ट्रेटनर, हेअर ड्रायर, इत्यादींचा वापर कमी करावा.
13. केसांच्या मुळांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी लोनअनुलोम योग प्राणायाम करावा.
14. केस ताणून बांधू नये.
15. हेअर स्टाईल करण्याकरिता जेल,लोशन इत्यादींचा वापर केल्याने केस गळती समस्या वाढू शकते.
16. केसांना आठवड्यातून एकदा कोकोनट ऑइल ने मालिश करा.
केस गळती थांबवण्यासाठी योग्य आहार घ्या, केसांची निगा राखा, भरपूर पाणी प्या, केसांसाठी केमिकल्स चा वापर कमी करा यामुळे केसांच्या समस्या नक्की कमी होतील.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा