जाणून घ्या मधुमेह संबंधी माहिती: Diabetes


मधुमेह (Diabetes) लक्षणे:- 

 मधुमेहाची आपल्याला प्रत्येक वेळी लक्षणे दिसून येतीलच असे नाही कारण तो आपल्या शरीरात छुप्या स्वरूपात असू शकतो. मधुमेहाची लक्षणे असल्यास रक्तातील साखरेची चाचणी करून मधुमेह आहे की नाही आपण ओळखू शकतो.

• वारंवार लघवीला जावे लागणे, 

• वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे,

• अचानकपणे वजन घटणे,

• अशक्तपणा, चक्कर येणे,

• अधिक भूक लागणे,

• हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे,

• डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे,

• मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे,

• जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे,

• मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.

घ्यावयाची काळजी:- 

* डायबिटीस आहे हे विसरून आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा.

* आपल्या सोबत नेहमी खडीसाखर ठेवा चक्कर आली असता वेळीच घ्या.

* दिवसभरात कमीत कमी १०-१२ ग्लास पाणी प्यावे.

* जेवणानंतर कमीत कमी दहा मिनिटे चालणे, उपाशी पोटी चालू नये.

* पायाची खास करुन काळजी घ्यावी. बरोबर मापाचे बुट, चप्पल वापरा व जखम होणार नाही याची काळजी घ्या.

* सोयाबीन चंक्स किंवा वडी भाजीमध्ये वापरा किंवा पाव किलो वडी पाच किलो गव्हासोबत दळण्यास द्या.

हे पदार्थ खाऊ नये:- 

* साय, तुप, मस्का, लोणी, चिज.

* साखर, गुळ, मध यापासून बनविलेले पदार्थ, मिठाई, जॅम, जेली केक,बिस्किटे, जेवणावरुन मीठ, खारवलेले पदार्थ, मासे, लोणचे, पापड खाऊ नये. * रसना, स्कॉश कोल्ड्रींक्स, थंडपेय, टेट्रोपॅक मधील ड्रींक्स पिऊ नये.

* बेकरीमध्ये मिळणारे खारी, बटर इत्यादी खाऊ नये.

* चरबीचे मटण, तळलेले मासे, भजी, पूरी, वडा, समोसा, फरसाण, पापड, लोणची,कलेजी, भेजा, गुडदा, सुकेमासे, कवच वाली मासे, अंड्याचा पिवळा भाग. 

* सोडा, अजीनोमोटो बेकिंग पावडर घेऊ नये. 

* रोजच्या भाजीला खोबरे शेंगदाणे व तीळ वापरु नये.



मधुमेह नियंत्रणासाठी पंचसुत्री :-

* सतत वजन नियंत्रणात ठेवा नियमित व्यायाम करा. 

* संतुलित, तीन ते चार वेळेस विभागुन आहार घ्या.

 * मानसिक व शारिरीक ताण तणाव कमी करा. 

* नियमित तपासण्या करा.

मधुमेही रुग्णांसाठी आहार :-

* सकाळी नाष्टा

- १ कप दुध (बिना साखरेचा) किंवा उकळलेले अंडे १ बशी पोहे किंवा उपमा किंवा २ इडल्या किंवा १ चपाती किंवा १ भाकरी.

* दुपारचे जेवण

- १ फळ - २ चपाती किंवा १ भाकरी व आर्धी वाटी भात.

१ वाटी वरण किंवा उसळ किंवा मोड आलेले कडधान्य. १ वाटी भाजी किंवा १ वाटी दही किंवा १ वाटी कच्ची कोशिंबीर, १ चपाती किंवा १ भाकरी.

* संध्याकाळी

- १ कप चहा (बिना साखरेचा )

- १ कप चहा (बिनसाखरेचा)

२-३ मारी बिस्किटे किंवा नाश्त्याप्रमाणे

* रात्रीचे जेवण - दुपारी प्रमाणे

* झोपताना

- १ कप दुध (बिनसाखरेचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024