World Health Day 7 April 2023.
WORLD HEALTH DAY
जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम सर्वांसाठी आरोग्य अशी आहे.
1950 मध्ये प्रथमच जागतिक आरोग्य संघटनेने आपला वर्धापन दिन जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी जागतिक आरोग्य दिन कोणत्या ना कोणत्या थीमनुसार साजरा केला जातो. 7 एप्रिल 2023 रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आरोग्य दिनासाठी सर्वांसाठी आरोग्य (World Health Day 2023 Theme- Health For All) ही थीम ठेवण्यात आली आहे.
- खरी मैत्री ही उत्तम आरोग्यासारखी असते, तिचे मूल्य हरवल्याशिवाय क्वचितच कळते.
- खरी शांतता म्हणजे मनाचा विसावा आणि झोप, शरीरासाठी पोषण आणि तजेला ज्यांना असे वाटते की त्यांच्याकडे शारीरिक व्यायामासाठी वेळ नाही, त्यांना लवकरच किंवा नंतर आजारपणासाठी वेळ शोधावा लागेल.
- एकतर प्लॅस्टिकचे विघटन होत नाही प्लॅस्टिकचा कचरा आरोग्यासाठी खूप घातक आहे. सर्वांनी प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिकचे आवरण असलेले खादयपदार्थ वापरणे बंद करायला हवे.
तसेच प्लॅस्टिकचे विघटनदेखील योग्य मार्गाने करायला हवे. घरातील व सोसायटीतील कचऱ्याची ओला सुका वर्गीकरण करुन विल्हेवाट लावली पाहिजे. जमेल तशी व तेव्हा परिसराची स्वच्छता केली पाहिजे व इतरांनादेखील त्यासाठी प्रवृत्त करायला हवे. तसेच मा. मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी आणलेली " सुंदर माझा दवाखाना " ही संकल्पना सार्वजनिक रुग्णालय अधिक समृध्द व सुंदर बनवणारी असुन यासाठी आपला सर्वांचाच सहभाग अत्यंत मोलाचा आहे.
आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण स्वच्छतेची शपथ घेऊन आपला परिसर व घर स्वच्छ राखण्याचा संकल्प करू या आणि ' सर्वांसाठी आरोग्य ' हा गजर सर्वत्र करू या.
आज या दिवशी, स्वतःसाठी काही संकल्प करा,
जेणेकरून तुम्ही आयुष्यभर निरोगी आणि आनंदी राहाल.
जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना
आरोग्यमयी शुभेच्छा !!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा