SURYA NAMASKAR YOGA / सूर्यनमस्कार'

 


उत्तम शारीरिक स्वास्थ्य व सामर्थ्य वाढविणारा व्यायाम

सूर्यनमस्कार' -   हा एक सर्वांगसुंदर व्यायाम आणि शारीरिक मानसिक विकास घडविणारा शास्त्रशुद्ध प्रकार आहे. सामर्थ्य व दीर्घायुष्य संपादन करण्याचा हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. ह्यालाच 'सूर्योपासना' वा 'बलोपासना' असे नामाभिधान आहे.

 यांत अशा दहा वेगवेगळ्या आसनांचा समावेश आहे की ज्यांच्यामुळे रक्तसंचालन उत्तम प्रकारे होऊन शरीरातील सर्व मांसपेशी, नाड्या व स्नायू पूर्णतया कार्यक्षम बनतात. तसेच ‘सूर्योपासना' ह्या शारीरिक तथा आध्यात्मिक तत्वाने ह्याचा अभ्यास केल्यास सूर्याच्या किरणांचा अमृततुल्य लाभ मिळतो. 

रोगप्रतिबंधक शक्ति वाढून रोगनिवारणाची किमया साध्य होते. प्रत्येक स्त्री-पुरुष, बालके, तरुण, प्रौढ, वयोवृद्ध व्यक्ती, मग ते कोणत्याही धर्माचे वा जातीचे असोत, सर्वांसाठीच ते एक वरदान आहे. 

 सूर्याची बारा नावे -  “नमः” ह्या प्रत्ययासहित पुढील प्रमाणे आहेत- १) मित्राय नमः । २) रवये नमः | ३) सूर्याय नमः । ४) भानवे नमः । ५) खगाय नमः । ६) पूष्णे नमः । ७) हिरण्यगर्भाय नमः । ८) मरीचये नमः । ९) आदित्याय नमः । १०) सवित्रेः नमः । ११) अर्काय नमः । १२) भास्कराय नमः ।

 सकळ दोषांचा परिहार । करितां सूर्यास नमस्कार ।  स्फूर्ति वाढे निरंतर । सूर्य दर्शन घेतां ।

 लाभ:-  आयुष्य, बल व बुद्धीचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, उदर स्नायू, कंबरेचे स्नायू, मेरुदंड, पायाची बोटे, गुडघे, सर्व सांधे ह्यांना व्यायाम घडतो. पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉइडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हात-पाय व काही हाडांचे दोष, पोटातील प्लीहा, गंडमाळा, घशातील विकार नाहीसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते. 

मानवाच्या सर्व शक्तिचा साठा मेरुदंड (पृष्ठवंश) व मेंदू (मज्जा) यात असतो. त्यात्याठिकाणची मजबूती वाढते. मनोबलाचा विकास होतो. अशा ह्या व्यायामप्रकाराचे सातत्य व पावित्र्य श्रद्धा, विचारशक्ति व मनोबलाच्या साहाय्याने टिकविले जाते. आपण करीत असलेल्या कृतीकडे मनाची एकाग्रता असावी. तिच्यामुळे रोगनिवारणाची इच्छाशक्ति निर्माण होते. 

इतर व्यायामांपेक्षा सूर्यनमस्काराचा व्यायाम वेगळा आहे कारण इतर व्यायामांतील कौशल्य स्नायूंचे कठिणत्व वाढविण्याच्या दृष्टीने असते तर सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य व कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवावयाचे असते. यांत रक्ताचे शरीरात समप्रमाणात संचालन असते

                                       


                                                     


               





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024