Dietary Oil consumption and Health:आहारातील तेलाचा वापर आणि आरोग्य

Dietary Oil consumption and Health.

आहारातील तेलाचा वापर आणि आरोग्यस्निग्ध पदार्थाचा आहारातील समावेश आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतो. तेलामुळे अन्नाची चव वाढते. याशिवाय A, D, E, K या  जीवनसत्त्वाच्या शोषण करता ते गरजेची असतात म्हणून त्यांचा आहारातील समावेश योग्य प्रमाणात असणे खूपच आवश्यक असते.

प्रौढाच्या तेलाच्या गरजा कमी असल्या तरी लहान मुलांची त्यांच्या शरीराच्या प्रती किलोग्रॅम वजनास उष्मांकाची गरज जास्त असल्याने व एका वेळी ती अधिक कर्बोदक युक्त आहार खावू शकत नसल्यामुळे त्याच्या आहारात अधिक तेलांचा समावेश करणे आवश्यक असते.

तेलबियांपासून मिळणारी तेले तसेच प्राणीजन्य पदार्थातील स्निग्धे असे आहारातील स्निग्धाचे स्त्रोत असतात. बहुतांश अन्नपदार्थात अदृष्य स्वरुपात तेले असतात. तेलबियामधून काढलेली तेले, तूप ही दृष्य तेले आहेत. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थामधील तेलांना छुपी तेले म्हणतात, तृणधान्ये कडधान्ये यांत थोड्या प्रमाणात अदृष्य स्वरूपात तेले असतात. परंतु बहुतांश प्राणीज पदार्थात हे प्रमाण लक्षणीय असते.

दृष्य, अदृष्य किंवा छुपी तेले यामधून आपल्या दैनंदिन गरजेच्या १५-३०% उष्मांक स्निग्ध पदार्थापासून मिळाले पाहिजेत बैठे काम करणाऱ्या व्यक्तींनी दररोज साधारणपणे २५ ग्रॅम तर श्रमाचे काम करणाऱ्या व्यक्तींनी ३० ते ४० ग्रॅम तेलाचा आहारात समावेश करावा. गरोदरपणात व मूल अंगावर पित असतांना तेलाच्या प्रमाणत ५ ग्रॅमने वाढ करावी. किशोरवयीन मुलामुलींच्या आहारात ३० ते ५० ग्रॅम तेलाचा समावेश असावा. परंतु आहारात तेलाचा अतिरेक टाळावा हे लक्षात घ्यावे.

माशांमध्ये हृदयासाठी उपयुक्त असणारे लाब साखळीयुक्त ओमेगा ३ फॅटी असिड्स असतात, खोबऱ्याचे तेल, वनस्पती तूप, प्राण्याची चरबी, दूध, दुधाचे पदार्थ यांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आढळतात. आहारातील सच्यरेटेड फॅट्सच्या अतिरेकाने उच्चरक्तदाब व हृदयविकाराचा धोका होऊ शकतो. त्यामुळे आहारात शरीराच्या एकूण गरजेच्या ४-१०% पेक्षा अधिक उष्मांक सॅच्युरेटेड फॅट्सच्या स्वरुपात असू नयेत.

वनस्पती तूप हे वनस्पती तेलावर हायड्रोजनेशनच्या प्रक्रियेने तयार करतात व त्यामुळे त्यात ट्रान्स फॅट्स तयार होतात, ट्रान्स फॅट्स शरीराला हानीकारक असतात. त्यांच्या सेवनामुळे LDL म्हणजे Bad Cholesterol वाढते व HDL म्हणजेच Good Chelasterol कमी होते. बेकरीतील हॉटेलमधील तसेच ढाब्यावरील पदार्थ, मिठाया यांच्यामध्ये वनस्पती तुपाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने त्यांचा आहारातील समावेश माफकच असावा.

तूप, लोणी, खोबरेल तेल यासारखी पारंपारिक तेले वापरण्याचे अजिबात बंद करू नये शरीराच्या पचन व रोगप्रतिकारशक्ती यामुळे आरोग्य रक्षणात त्यांचे महत्त्व आहेच. खोबऱ्याच्या तेलात सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स असले तरी त्यांचा परिणाम इतर वनस्पतीजन्य तेलातील अनसॅच्युरेटेड फॅटी असिड्स प्रमाणे असल्याने इतर तेलांसोबत त्यांचा मिश्र वापर करता येईल. त्यामध्ये असणारे बालकांच्या विशेष करून कुपोषित बालकांच्या आतड्यातसुद्धा शोषले। जात असल्याने त्यांच्या उपचारात्मक आहारात खोबरेल तेलाला महत्त्वाचे स्थान आहे.

प्रत्येकच तेलामध्ये आवश्यक स्निग्धाम्लांचे योग्य प्रमाणात असत नाही. त्यामुळे आपल्या स्वयंपाकगृहात मोहरी, राईस बान तीळ, रेपसीड, शेंगदाणे, ऑलीव्ह ऑइल, कनोला इ. विविध प्रकारच्या तेलांचा मिश्र वापर करावा. शाकाहारातून योग्य प्रमाणात स्निग्धाम्ले मिळण्यासाठी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलातून मिळणाऱ्या जिनोलिक ऍसिडिटीचे प्रमाण कमी करुन अल्फा लिनोलिक ऍसिडिटीचे प्रमाण अधिक राहील याची दक्षता घेणे गरजेचे असते.

मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स (MUFA) यांच्यामुळे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्ट्रॉल कमी होत असल्याने शरीराला ते आवश्यक असतात.पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स (PUFA) यांच्यामुळे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्ट्रॉल कमी होत असल्याने शरीराला ते (राईस ब्रान) आवश्यक असतात यामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिडिटीचा समावेश होतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024