आयोडीनयुक्त मिठाचे महत्व (Importance of iodized salt)

आयोडीनयुक्त मिठाचे महत्व-
मानवी शरीरासाठी रोजची लागणारी आयोडीनची सर्वसाधारण मात्रा प्रौढ व्यक्तीस दररोज सरासरी 150 मायक्रोग्रम व गरोदर तसेच स्तनपान देणाऱ्या महिलेस दररोज सरासरी 200 मायक्रोग्रम एवढी आयोडीनची आवश्यकता असते.
आयोडीन कमतरतेमुळे सौम्य किंवा अति गंभीर आजार होऊ शकतात. गलगंड हा आजार आयोडीन कमतरतेचे एक लक्षण आहे. या मध्ये थायरॉईड ग्रंथीची वाढ होते यालाच गलगंड असे म्हटले जाते. तसेच स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात व नवजात बालकांचे मृत्यू होतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे नवजात बाळामध्ये तिरळेपणा येतो, मेंदूची वाढ खुंटते, शारीरिक वाढ खुंटते, मूकबधिरपणा येतो, बुद्ध्यांकाची दहा ते पंधरा अंशाने घट होऊ शकते.
त्यामुळेच समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी 21 आक्टोंबर हा दिवस जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
आपली भावी पिढी मानसिक व शारीरिक दृष्ट्या भक्कम होण्यासाठी आहारामध्ये आयोडीन युक्त मीठाचाच वापर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मिठातील आयडीचे प्रमाण प्रयोगशाळेतील तपासणी व्यतिरिक्त MBIKITS चाचणी किटद्वारे कोणालाही तपासणी करता येते. आपल्या घरामध्ये शिजवलेल्या भातावर जर मीठ टाकले आणि त्यावर थोडे लिंबू पिळले असता जांभळा रंग दिसल्यास मिठामध्ये योग्य प्रमाणात आयोडीन आहे असे समजावे.
आयोडीन युक्त मिठातील आयोडीन हे उष्णता, दमट हवामान व सूर्यप्रकाश यामुळे कमी होते. त्यामुळे आयोडीन युक्त मीट हे हवाबंद भरणीत व आद्रता विरहित जागेमध्ये ठेवणे जास्त महत्त्वाचे असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा