31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन
31 May World No - Tobacco day
ज़िन्दगी चुनो, तम्बाकू नहीं.
तंबाखू काय आहे ?
तंबाखूमध्ये निकोटीन असते, जी तंबाखूची सवय लागताना मुख्य घटक असते. त्यामुळे तंबाखूवरील व्यक्तिचे शारिरीक आणि मानसिक अवलंबित्व वाढते. निकोटीन हे विषारी रसायन असून एक वेळ सामान्य मनुष्यालाही मारू शकते. निकोटीन व्यतिरीक्त तंबाखूमध्ये ४,००० पेक्षा जास्त विषारी रसायने असतात.
तंबाखू विषयी अधिक माहिती -
तंबाखूमध्ये असणारे अल्कोलाइड रसायन कोटीनाईड, अँन्टीबीन, अनाबेसीन, अँलीकटीक, हायड्रोकार्बन इ रसानामुळे तंबाखुला चव येते. तंबाखुमध्ये असणारे फायटिस्टेरॉल रसायान: कोलेस्ट्रॉल, कॅम्पेस्टेल, क्लोरिजेनिक अँसिड, रुटीन, सेव्हरल फ्री अमिनो अँसिड इत्यादी. भारतीय तंबाखूमध्ये मयुरी, लेड, कॅडमियन, क्रोमियम इत्यादी अति विषारी रसायन आढळतात.
तंबाखू सेवनाचे विविध प्रकार-
१) विडी २) सिगरेट ३) सिगार ४) चिरुट ५) चुटटा ६) धूमती ७) पाइप ८) हकली ९) चिलीम १०) हुक्का
भारतामध्ये तंबाखूचा वापर-
• भारतामध्ये तंबाखूचा वापर
पुरुषांच्या तुलतेन महिलांचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण कमी आहे. • भारतामध्ये १४ करोड पुरुष आणि ४ करोड महिला
तंबाखूचे नियमित सेवन करतात.
• तरुणांच्या तुलनेत प्रौढांचे
प्रमाण जास्त • शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात सेवनाचे प्रमाण जास्त.
भारतातील धुम्रपानाचे प्रमाण-
• सिगरेट : १ करोड सिगरेट दररोज
भारतामध्ये सेवन केल्या जातात,
• भारतीय सिगरेटमध्ये डांबर
आणि निकोटीन यांचे प्रमाण विकसीत देशांच्या तुलनेत अधिक आहे.
• प्रत्येक सिगरेट जीवनातील
७ मिनिटे कमी करते.
निष्क्रिय धुम्रपान -
● जेव्हा एखादी व्यक्ती धूम्रपान करते तेंव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात सुमारे ३० टक्के तंबाखूचा धूर जातो; तर सुमारे ७० टक्के घर हा वातावरणात सोडला जातो. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आबाजूच्या व्यक्ती ह्या वातावरणातील सोडलेला घर नकळत सेवन करतात. यालाच निष्क्रिय धुम्रपान असे म्हणतात.
● निष्क्रिय धूम्रपानामुळे कॅन्सरचा
धोका २५ अधिक
●हृदयविकाराचा धोका ३० अधिक श्वसनासंबंधी आजार व दमा यांचा धोका मुलांमध्ये वाढतो.
तंबाखू सेवनाचे विविध प्रकार-
१) तंबाखू पदार्थ चावून खाणे :
● तंबाखू पदार्थ चावून खाणे
ह्या स्वरुपात तंबाखू हा विविध पदार्थासोबत मिसळला जातो आणि त्याचे सेवन केले जाते.'
• सेवन करणारे तंबाखू तासंतास
गाल आणि हिरड्या, ओठ यांच्यामध्ये ठेवतात. उदा.: विडा (खाण्याचे पान), पान मसाला, मावा, गुटखा, खैनी इ.
२) किमाम
• पानातील किमाम हा चॉकलेटी
रंगाचा चिकट द्रव पदार्थ हाअतिशय विषारी आहे.● किमाममध्ये धातुला विरघळण्याचे सामर्थ्य आहे ● किमाम काचेच्या छोट्या बाटलीमध्ये ठेवला जातो.
३) तंबाखूचे नाकाद्वारे सेवन
• तपकीर / छिकनी / सुधनी ह्या
नावाने ओळखल्या जाणाया तंबाखू जन्य पदार्थाचे नाकाद्वारे सेवन करतात.
● बार ही तपकीर असून दात घासण्यासाठी, हिरडा स्वच्छ करणेसाठी याचा
वापर होतो. सदर पदार्थ हा गुजरात मधील खिया अधिक प्रमाणात वापरतात.
गुटख्यामध्ये असणारे इतर विषारी पदार्थ-
● तंबाखु, सुपारी, चुना कात तसेच मॅग्नेशियम
कार्बोनेट, शिसे, आर्सेनिक इ. शरीरास
हानिकारक पदार्थ गुटख्यामध्ये असतात.
• शिसे तर लहान मुलांच्या बौद्धिक
विकासासाठी अत्यंत घातक असते,
• गुटखा जास्त दिवस पावडर स्वरुपात
रहावा व त्याच्या गुठळ्या बनू नये यासाठी गुटखा कंपन्या गुटख्यात जास्त प्रमाणात मॅग्नेशियम
कार्बोनेट मिसळतात.
• त्यामुळे २००२ साली महाराष्ट्र
शासनाने गुटख्यावर बंदी आणली होती..
तंबाखू आणि कॅन्सर -
तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक,पोट, गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो.
• भारतात दरवर्षी २ लाख ५० हजाराहून
अधिकलोकांना तंबाखूमुळे कॅन्सर झाला आहे. ह्याचे निदान होते.
• कॅन्सर हा तंबाखू सेवनामुळे होतो हे निष्पन्न झाले आहे.
तंबाखू सेवनाचे अल्प कालावधीतील शरीरिक दुष्परिणाम -
• केसांना दुर्गधी : तंबाखू
सेवन करणाऱ्याच्या केसांना दुर्गंधी येते.
• तोंडांची दुर्गंधी : तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्याच्या • दातांच्या समस्या : तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनामुळे दात सडत जातात हिरड्यांना इजा होऊन दात निकामी होतात. त्यांची मजबूती नष्ट होते. दातांवर चॉकलेटी- पिवळे डाग पडतात.
तंबाखू पासून मुक्ती मिळवण्यासाठी काय करावे-
• तंबाखू सोडणे ही सोपी बाब
नाही; ह्यासाठी दुर्दम आत्मविश्वासाची गरज असते. तंबाखूपासून
मुक्त होण्यासाठी स्वतः सकारात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास वाढवायला पाहिजे, खालील युक्त्या तंबाखू सोडण्यासाठी
उपयुक्त ठरतात.
१) घोषणा करा : तंबाखू सोडण्याच्या
तारखेच्या घोषणा आपल्या कुटुंबीयांसमोर, नातलगांसमोर किंवा मित्रांसमोर करा. २) परिहार
: अशा जागा आणि व्यक्तीपासून दूर रहा, ज्या तंबाखू सेवनासाठी प्रवृत्त करतील.
(३) कृती : अशी सवयी जोपासा ज्यामुळे हात व्यस्त राहतील. • जव्हा तंबाखू सेवनाची
इच्छा होते तेंव्हा १०० ते १ अंक मोजणे
• तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यावर
आपल्या पूर्वीच्या आनंदी क्षणांना आठवणे.
• पळणे, रशी उडी, प्राणायाम वगरे व्यायाम करणे.
४) पाणी पिणे तंबाखू सेवनामुळे शरीरात अस्तित्वात असणारी विषारी रसावणे शरीराबाहेर टाकण्यासाठी पाणी प्यावे.
• तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यावर तंबाखू ऐवजी आरोग्यदायी पदार्थ सेवन करावे. जसे कुरमुरे, चणे, शेंगदाणे, बडीशेप इत्यादी
• मित्रांसोबत आपले विचार, भावना शेअर करणे,
५) स्वत ला फसवू नका मी एकदा तंबाखू सेवन केले तर काय फरक पडेल, असा विचार करुन पुन्हा तंबाखू सेवनाच्या जाळ्यात अडकू नका. ६) औषधोपचार : जर तुम्ही वरील पद्धतीने तंबाखूची सवय सोडण्यास यशस्वी होत नसाल तर वैद्यकीय मदत घ्या.
तंबाखू सोडण्याचे फायदे-
• व्यक्तीगत लाभः
१) जीवनमानात सुधारणा
३) शरीर क्षमता (Stamina) वृद्धी
५) आत्मविश्वास वाढतो
• कौंटुबिक लाभ
१) कुटुंबात आनंदी वातावरणाची
निर्मिती होईल.
२) आरोग्य वृद्धी
४) वृद्धत्वाच्या लक्षणांमध्ये
कमी
६) पैशाची बचत कौटुंबिक लाभः
२) कुटुंबातील लोकांची अप्रत्यक्ष
धुम्रपानामुळे होणारी हानी थांबू शकेल. ३) तुम्ही तुमच्या मुलांसाठी आदर्श बनू शकता.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा