Blood donation ( रक्तदान )









क्तदान... जीवनदान 

करूनी दान रक्ताचे जोडा नाते बंधुत्वाचे
एक थेंब...रक्ताचा फुलवितो अंकुर जीवनाचा.

उठ मित्रा उठ! जा कर रक्तदान! 
तेच आहे जीवनातील सर्वश्रेष्ठ दान!
त्यानेच वाढतो जनम माणसात सन्मान!
मग वाटेल सर्वांना तुझा अभिमान!

रक्तदान हे अनमोल असे जीवनदान आहे. आपले रक्तदान एखाद्या गरजवंताला, रुग्णांला अपघातग्रस्तांला जीवनदान ठरु शकते. कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज भासेल हे सांगता येत नाही. म्हणूनच करून दान रक्ताचे, ऋण फेडूया समाजाचे हा नारा आपण सर्वानीच अंगीकारला पाहिजे.

होय रक्तदान करण्याचे आपल्या शरीरासाठी देखील खूप फायद्याचे आहे.

1.हृदयाचे आरोग्य सुधारते :-                

 रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. 

 2. लाल रक्तपेशींमध्ये वाढ  3. वजन घटते 4. कॅन्सरचा धोका कमी   

 5. निरोगी आरोग्य 6. आरोग्य तपासणी केली जाते. 

नॅट टेस्टेड रक्त म्हणजे काय ?

सर्व प्रगत देशांमध्ये बंधनकारक असणारी जगातील सर्वात सुरक्षित रक्त तपासणीची पध्दत म्हणजे नॅट होय. (Nucleic Acid Amplification Test (NAT)

 नॅट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रतिकारकांऐवजी थेट रक्तातील संक्रमीत जनुके (DNA & RNA) शोधून काढली जातात.

त्यामुळे विंडो पिरियड कित्येक पटींनी कमी होतो.

रक्तदान कोण करु शकतो ?

18 ते 65 वयोगटातील आणि ज्यांचे वजन 50 किलो ग्रॅम पेक्षा जास्त आहे. अशी कोणतीही व्यक्ती रक्तदान करु शकते

 रक्तदान का करावे ?

माणसाला फक्त माणसाचेच रक्त चालते. मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही. ते कोणत्या कारखान्यात तयार होत नाही. की कोणत्या प्रयोगशाळेत मिळत नाही. रक्तदान केल्याने रुग्णाचा जीव वाचण्यास निश्चितच मदत होते. रक्तदान करणान्याला कोणतेही शारीरिक नुकसान पोहोचत नाही. रक्तदान है सामाजिक कर्तव्य आहे.

रक्तदात्याचे हिमोग्लोबीन 12.5 ग्रॅमच्या वर असावे. नजीकच्या काळात तुम्हाला काही आजार उदा. कावीळ, मलेरिया रोग होऊन गेला असेल तर डॉक्टरांना आठवणीने त्याची माहिती  द्या. हे तुमच्या तसेच ज्यांच्यासाठी रक्त देता त्यांच्या हिताचे आहे. निरोगी मनुष्यच रक्तदान करु शकतो.

 रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा येईल का ?

 मुळीच नाही!  फक्त 230 मि.ली. म्हणजेच केवळ पाचच टक्के रक्त तुम्ही देता. दिलेले २४ तासात शरीर पुन्हा तयार करते रक्तदान केल्यानंतर लगेच संबंधीत दैनंदिन काम करू शकते. 

 रक्तदान केल्यामुळे काय फायदा ?

कोणतेही दान हे एक पुण्यकर्म आहे. रक्तदान हे तर सर्वात श्रेष्ठ दान. कारण त्यामुळे आपण  एखाद्याचा जीव वाचवतोच पण रक्तदान  रक्तदात्याच्या  नवीन रक्त निर्माण करण्याच्या नैसगिक प्रक्रियेला प्रेरक ठरते.

  किती वेळा रक्तदान करता येते?

पुरुषांना तीन महिन्यातून एकदा आणि एका वर्षात चार वेळा रक्तदान करता येते.स्त्रियांसाठी चार महिन्यातून एकदा रक्तदान करता येते.

एकावेळी रक्तदात्याला किती रक्तदान करता येते?

माणसांच्या शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असते. रक्तदात्याला एका वेळी 350 मिली लिटर रक्त सहज देता येते.

रक्तगट कोणता आहे हे कसे समजावे ? सर्वाचे रक्त सारखेच असते का?

रक्ताचे ए. बी. एबी व ओ असे चार प्रमुख गट असतात. या चारही आरएच पॉझिटीव्ह किंवा आर. एच. निगेटिव्ह असे दोन उपगट असतात. भारतातील फक्त ५ टक्के लोक आर. एच. निगेटिव्ह आहेत. कोणत्याही व्यक्तीला रक्ताची गरज पडू शकते.

 रक्तदान कोठे करता येते ?

कोणत्याही सरकारमान्य रक्त पेढीतच रक्तदान करावे.

 स्वतःचे रक्त स्वतः साठी वापरता येते, हे खरे आहे का?

होय! ही बाब 100 टक्के खरी आहे. ज्या व्यक्तीची शस्त्रक्रिया पूर्व नियोजित असते जी व्यक्ती या आजाराव्यतिरिक्त स्वस्थ असते त्यांच्यासाठी  स्वतःचे रक्त स्वतःसाठी वापरता येते.

स्वतःचे रक्त स्वतःसाठी वापरण्याचे फायदे कोणते ?

१.ऐनवेळी धावपळ करण्याची गरज नसते.

२.रिअँक्शन होण्याची शक्यता नसते.

३.स्वतः चे रक्त अत्यंत सुरक्षित असते.

वरील सर्व रक्तदानाचे महत्त्व पाहता पुन्हा एकदा म्हणावेसे वाटते..

करूनी दान रक्ताचे जोडा नाते बंधुत्वाचे

एक थेंब... रक्ताचा फुलवितो अंकुर जीवनाचा 

संकल्प करूया रक्तदानाचा,

निर्धार करूया जीवनदानाचा...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024