किटकजन्य आजाराची लक्षणे . Symptoms of Insect - Borne Diseases

 


 किटकजन्य आजाराची लक्षणे .  

 Symptoms of Insect - Borne Diseases


 1) हिवताप ( Malaria) :- 

लक्षणे- 1) थंडी वाजून ताप येतो. 2) ताप सततचा असतो किंवा एक दिवसा आड येऊ शकतो. 3) नंतर घाम येऊन अंग गार पडते. 4) ताप आल्यानंतर डोके दुखते. 5) बऱ्याच वेळा उलट्याही होतात.

(2) मेंदूचा हिवताप ( Cerebral Malaria) :- 

फॅल्सीफेरम प्रकारच्या हिवतापात वेळेवर योग्य 

उपचार न मिळाल्यास मेंदूचा हिवताप होऊ शकतो.  

 लक्षणे :-

  •   तीव्र ताप 
  •  तीव्र डोकेदुखी / व उलट्या होणे. 
  •  मान ताठ होणे.
  •   झटके येणे 
  •  बेशुद्ध होणे. 

(3) अ) डेंग्यू ताप:- ( Dengue fever ) 

लक्षणे :- 1.एकाएकी तीव्रताप येतो. 2.तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखी, सांधेदुखी होते. 3.उलट्या होतात. 4.दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोळेदुखी होते. 5.अशक्तपणा येतो भूक मंदावते. 6.जास्त तहान लागते व तोंडाला कोरट पडते. 7.ताप कमी जास्त होतो. 8.अंगावर पुरळ येते.

 ब) रक्तस्त्राव युक्त डेंग्यू ताप:-

 लक्षणे :- 1) डेंग्यू तापाची वरील प्रमाणे लक्षणे आढळून येतात. 2) रक्तस्त्राव युक्त डेंग्यू ताप बहुतांशी पंधरा वर्षाखालील मुलांना होतो तसेच मोठ्या व्यक्तींना देखील होऊ शकतो. 3) त्वचेखाली रक्तस्त्राव होतो. 4) नाकातून रक्तस्त्राव होतो. 5) रक्ताची उलटी होते. 6) रक्त मिश्रित किंवा काळसर रंगाची शौचाला होणे पोट दुखणे. 7) रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो या गंभीर बेशुद्ध अवस्थेला डेंग्यू शॉक सिंड्रोम असे म्हणतात.

 (4) जपानी मेंदुज्वर :-

    लक्षणे :-    जापनीज एनसेफलायटीस(जे. ई.)    

     1) तीव्र स्वरूपाचा ताप येणे. 

     2) अंगदुखी डोकेदुखी व उलट्या होणे.                 

     3) वर्तणुकीत लक्षणीय बदल होणे.

     4) झटके येणे.                                                     

     5) बेशुद्ध होणे. 

     7)  हा आजार पंधरा वर्षाखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असून त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण 20 ते 40 टक्के असू शकते. 


(5) चिकुनगुनिया :-   

  लक्षणे :-

 1) तीव्र ताप येणे

 2) तीव्र सांधे दुखी , अंग दुखी होते. 

3) अंगावर पुरळ येतात.


 (6) लसिका ग्रंथीचा हत्तीरोग:- (Lymphatic Filariasis) 

  लक्षणे व चिन्हे :- 

  यामध्ये चार अवस्था असतात. 

अ)  जंतू शिरकावाची अवस्था:-

जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांची वाढ व विकास सुरू होतो व लसिका ग्रंथी सुजतात,  वेदना होतात, ताप येतो आणि आजाराच्  निदान हे  इओसिनोफिलिया, लसीकाग्रंथी सूज, पॉझिटिव्ह इंट्राडर्मर टेस्ट जखमेच्या भागात वास्तव्य, यावरून करता येते.

ब) लक्षणाविरहित अवस्था /वाहक अवस्था:-  रक्ताच्या रात्र कालीन तपासणीत रोगजंतूच्या सूक्ष्म अळ्या दिसतात. परंतु रोगाची कोणतीही लक्षणे व चिन्हे दिसत नाहीत.

 (क) तीव्र लक्षण अवस्था:-  या अवस्थेमध्ये ताप लसीका ग्रंथीचा दाह, लसिका ग्रंथीस सूज तसेच पुरुषांमध्ये वृषण दाह इत्यादी लक्षणे दिसून येतात.

(ड) दीर्घकालीन संसर्ग अवस्था:- हात, पाय व बाह्य  जननेंद्रियावर सूज (एलिफंटँसिस) हायड्रोसिल, काइलोयुरिया इ. लक्षणे आढळतात.

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024