आरोग्यासाठी नियम: Health Tips
१. या देहरुपी देवालयाचे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य असे तीन महत्वाचे आधारस्तंभ आहेत. २. आहार शक्यतो सात्विक, हलका व पाचक असावा, मसालायुक्त तळलेले पदार्थ,अति तिखट यांचे सेवन टाळावे. ३.जेवताना पाणी कमी प्या आणि जेवल्यानंतर अर्ध्या तासांनी पाणी पिऊ शकता. दात मिटून पाण्याची चव घेत पाणी प्यायलेले चांगले. ४. कमी खावे, खूप चावावे म्हणजे शिळी भाकरीपण पचत असते. पोटाचे दोन भाग अन्नासाठी, एक भाग पाण्यासाठी व एक भाग हवेसाठी असावा. ५. रात्रीचा आहार अल्पच घ्यावा. रात्री १० च्या पुढे जागू नये व सकाळी ५ च्या पुढे झोपू नये. आरोग्यासाठी ७ तासांची झोप पुरे आहे. ६. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपता कामा नये. साधारण एक तासाच्या अंतराने झोपावे. रात्री आंबट पदार्थ सेवन वर्ज्य समजावे. ७. झोपताना शक्यतो डाव्या कुशीवर झोपले पाहिजे. त्यामुळे सूर्य नाडीचा प्रवाह चालू राहून रात्रीचे अन्न पचण्यास मदत होते. पण अधूनमधून डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर झोपण्यास हरकत नाही. ८. झोपण्याआधी थंड पाण्याने हात, पाय, तोंड धुऊन व 'नेत्र स्नान' घेऊन झोपावे. झोप शांत लागेल. स्वप्नदोष टळतील. ९. पालथे झोपण्याची सवय ...