SYMTOMS OF MOUTH AND THROAT CANCER . तोंड आणि घशाच्या कर्करोगाची लक्षणे:-

                                                                                                     
SYMTOMS OF MOUTH AND THROAT CANCER 

 तोंड आणि घशाच्या कर्करोगाची लक्षणे:-

 १.सारखे तोंड येणे, तोंडात जखम किंवा व्रण येणे, तोंडात पांढरा, लाल किंवा काळा चट्टा येणे गिळायला त्रास होणे सुरुवातीला पातळ पदार्थ गिळता येतात पण भाकरी, पोळी सारखे घन पदार्थ गिळतांना त्रास होतो. 

 आजार जसजसा वाढत जातो तसतसा पाणी, सरबत यासारखे पातळ पदार्थ गिळायला पण त्रास होऊ लागतो.  ३. मानेत गाठी येणे (lymph node enlargement) – बहुतेक वेळा ह्या गाठी टणक (hard) असतात.  ४. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ आवाज बसलेला असणे.  ५. थुंकीतून रक्त पडणे  ६. घसा वरचेवर साफ करायला लागणे, अथवा सततचा खोकला .  ७. दम लागणे.  ८. अकारण वजन कमी होणे. 

 अशी सुरवाती ची लक्षणे आढळल्यास त्वरेने वैद्यकीय सल्ला घेऊन तपासणी आणि उपचार करून घेतल्यास कर्करोग पूर्ण पणाने बरा होऊ शकतो. 

 तोंडाचा कर्करोग एक असा कर्करोग आहे की ज्याची कर्करोग होण्याच्या आधीची लक्षणे म्हणजे

 निरनिराळ्या रंगाचे चट्टे (precancerous lesions) खूप दिवस आधी दिसतात. तेव्हा कर्करोग झालेला नसतो.

 पण त्यावर तंबाखू किंवा तत्सम कारणीभूत घटक प्रक्रिया करत राहिले तर ह्या निरुपद्रवी चट्ट्यांचे कर्करोगात रूपांतर होते आणि जीवावर बेतते. 

तोंडाच्या कर्करोगाच्या आधीची लक्षणे कोणालाही चटकन ओळखता येण्यासारखी असतात किंवा अगदी स्वतःला सुद्धा त्यासाठी तोंडाच्या कर्करोगाच्या सुरवातीच्या लक्षणांबद्दल जागरूकता असणे आवश्यक आहे. 

 कारण ही साध्या तोंडाच्या तपासणीने लक्षात येऊ शकतात. तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीची प्रशिक्षित आरोग्य सेवकां तर्फे तोंडाची तपासणी करून घ्यायला पाहिजे. टॉर्चच्या सहाय्याने तोंडाचे विविध भाग तपासता येतात. 

तोंडाच्या कुठल्याही भागात विशेषतः हिरड्या आणि गालाची आतली बाजू या मधला भाग, गालाच्या आतली अंतर्त्वचा जिथे तंबाखूची गोळी ठेवली जाते, 

 तेथे पांढरा, लाल किंवा काळा चट्टा आहे का हे पहिल्यांदा तपासणे आवश्यक आहे. तसेच तिथले दात सैल झाले अथवा पडले आहेत का किंवा तिथे जखम आहे का  हेही तपासायला हवे. नंतर तोंड पूर्णपणे उघडता येते की नाही ते बघणे. 

गालाचा आतला भाग, जीजिभेखालचा भाग, टाळू, घसा, इ. तोंडाच्या विविध भागांची तपासणी करून त्यात जखम, गाठ, चट्टा किंवा कुठलाही बदल आढळल्यास त्वरित तज्ञांकडे पुढील तपासणीसाठी जाणे आवश्यक आहे. 

आधी तंबाखू खाऊच नये. जर सवय लागलेली असेल तर ती प्रयत्न पूर्वक सोडावी, तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. 

सकस चौफेर संतुलित आहार घ्यावा, वरचेवर तोंडाची तपासणी स्वतः करावी किंवा करून घ्यावी म्हणजे तोंडाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करता येईल आणि जर झालाच तर त्यापासून होणारा मृत्यू टाळता येईल. 

 अशी तपासणी सर्वानीच आणि विशेषतः तंबाखू चे सेवन करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःच्या स्वतः महिन्यातून एकदा करणे आवश्यक आहे. 

कुठलीही लक्षणे किंवा बदल आढळल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024