पोस्ट्स

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024

इमेज
  मलेरियाचा नायनाट करण्यासाठी कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करून व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्यांचा सहभाग प्राप्त करून घेण्यासाठी  दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस   हिवताप  दिन साजरा करण्यात येतो.  राज्याच्या सततच्या आणि सामूहिक प्रयत्नामुळे देशाने मलेरिया प्रकरणे आणि मृत्यूमध्ये लक्षणीय घट केले आहे.  सर्वसाधारण माहिती :-  हिवताप हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतूपासून होतो.   हिवतापाच्या जंतूचे फॅल्सीफेरम व व्हायव्हँक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात    हिवतापाचा प्रसार अँनाफिलीस डासाच्या मादीमार्फत होतो. हिवतापाचा आधिशयन काळ 10 ते 12 दिवसाचा असतो. 1) हिवताप ( Malaria) :-       लक्षणे :- थंडी वाजून ताप येणे. ताप हा सतत येऊ शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो. नंतर घाम येऊन अंग गार पडते. ताप आल्यानंतर डोके दुखते. बऱ्याच वेळा उलट्याही होतात. 2)  मेंदूचा हिवताप ( Cerebral Malaria) फॅल्सीफेरम प्रकारच्या हिवताप रुग्णास वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास मेंदूचा हिवत...

DIET TO PREVENT HEART DISEASE / हृदयविकार टाळण्यासाठी आहार

इमेज
DI ET TO PREVENT HEART DISEASE: हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा. DI  जाणून घ्या लक्षणे आणि उपाय,आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरावर मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. जेवणाची, झोपण्याची वेळ चुकत असल्याने त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. त्यामुळे आजकालच्या तरुणाईला विविध रोगांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय वाढत्या प्रदूषणामुळे आपले शरीर कमकुवत होत चालले आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच हृदयविकाराचा त्रास संभवत आहे. आधीच्या काळात हृदयविकार हा आजार वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र आता हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होत आहे. WHO आणि अमेरिकन जर्नलच्या अभ्यासानुसार, 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयाच्या समस्यांमध्ये 13 टक्के वाढ झाली असल्याचे म्हणले आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठा आजार हृदयविकार हा झाला आहे. अहवालानुसार गेल्या तीन दशकांत भारत देशात हृदयविकाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अगदी दुप्पट झा...

हलासन / HALASAN

इमेज
       हलासन : अवधी १ मिनीट लाभ :-    मेरुदंडाला लागून असलेल्या नाड्यांवर तणाव आणला जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढते.  पाटीच्या कण्याची लवचिकता वाढविली जाते. त्यामुळे नेहमी तारुण्य अनुभवास येते.  यकृत, हृदय इ. इंद्रियांची कार्यक्षमता वाढते. पोट व कमरेच्या भागांतील अनावश्यक मेद कमी होऊन बांधा सडसडीत व सुडौल होतो. अग्निमांद्य, अपचन, वातविकार इ. दूर केले जातात.  ओटीपोटांतील ७२,००० नाटयांच्या प्राथमिक शुद्धिकरणास मदत होते. स्त्रियांच्या मासिकाच्या दोषांवर चांगला परिणाम होतो.

सर्वांगासन योगासन करण्याचे फायदे / sarvangasana benefits

इमेज
  1 ) सर्वांगासन :   अवधी  :  ३ते५मिनीटे   लाभ :-   1) मेंदूकडे होणारा रक्त पुरवठा वाढविला जातो .  2) थायरॉइड्सची कार्यक्षमता वाढते .  3) दृष्टी सुधारून डोळ्यांचे काही किरकोळ विकार दूर होतात .     4) सर्वांगासन ' निर्धोक व सहज साध्य असून ते शिर्षासनाला सर्वोत्तम असे पर्यायी आसन आहे .  5) केस गळणे कमी होते .  6)   त्वचा निरोगी , चमकदार राहण्यास मदत होते . 7) शिर्षासनाचे सर्व लाभ या आसनांत मिळतात . शरीर चपळ व बुद्धी तल्लख बनते .     8)   प्राणायामादि कर्मानंतर प्राणाची उर्ध्वगति टिकविण्यासाठी तसेच ' विपरित करणी मुद्रे साठी आवश्यक व उपयुक्त असे हे आसन आहे .

SURYA NAMASKAR YOGA / सूर्यनमस्कार'

इमेज
  उत्तम शारीरिक स्वास्थ्य व सामर्थ्य वाढविणारा व्यायाम सूर्यनमस्कार' -    हा एक सर्वांगसुंदर व्यायाम आणि शारीरिक मानसिक   विकास घडविणारा शास्त्रशुद्ध प्रकार आहे. सामर्थ्य व दीर्घायुष्य संपादन करण्याचा हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. ह्यालाच 'सूर्योपासना' वा 'बलोपासना' असे नामाभिधान आहे.  यांत अशा दहा वेगवेगळ्या आसनांचा समावेश आहे की ज्यांच्यामुळे रक्तसंचालन उत्तम प्रकारे होऊन शरीरातील सर्व मांसपेशी, नाड्या व स्नायू पूर्णतया कार्यक्षम बनतात. तसेच ‘सूर्योपासना' ह्या शारीरिक तथा आध्यात्मिक तत्वाने ह्याचा अभ्यास केल्यास सूर्याच्या किरणांचा अमृततुल्य लाभ मिळतो.  रोगप्रतिबंधक शक्ति वाढून रोगनिवारणाची किमया साध्य होते. प्रत्येक स्त्री-पुरुष, बालके, तरुण, प्रौढ, वयोवृद्ध व्यक्ती, मग ते कोणत्याही धर्माचे वा जातीचे असोत, सर्वांसाठीच ते एक वरदान आहे.    सूर्याची बारा नावे  -  “नमः” ह्या प्रत्ययासहित पुढील प्रमाणे आहेत- १) मित्राय नमः । २) रवये नमः | ३) सूर्याय नमः । ४) भानवे नमः । ५) खगाय नमः । ६) पूष्णे नमः । ७) हिरण्यगर्भाय नमः । ८) मरीचये नमः । ९) आद...

yoga Information जाणून घ्या योगा विषयी

इमेज
  वास्तविक योग रोग-प्रतिबंधक आहे, रोग निवारक नाही. परंतु अनुभवाने असे सिद्ध झाले आहे की, किरकोळ स्वरुपाचे आणि प्रारंभिक अवस्थेतील काही रोग जसे सर्दी, खोकला, कफाचे सर्व विकार, मलावरोध आदी तक्रारी योगातील प्राथमिक शुद्धिक्रियांनीच नाहीसे होऊ शकतात.  तसेच काही असाध्य असलेले जटील विकारही दूर होऊ शकतात. आमचे भारतीय योगी रोग-निवारणार्थ हठयोगाचा उपयोग करीत असत. आणि खरोखरच योगक्रियांचे योग्य आचरण करून अनुभवाने सहज रोग बरे करता येतात, असा आमचा पण अनुभव आहे.  वेळ, पैसा वाचविला जाऊन आयुरारोग्य वाढत असते. ज्यांनी जीवनाची आशा सोडली आहे, आता आत्महत्या केलेली बरी असा दुःखाचा सुस्कारा टाकीत शेवटचा इलाज म्हणून योगाचा सहारा घेणाऱ्या कितीतरी महाभागांना या योगामुळे जीवदान मिळालेले आहे. जेथे इतर सर्व इलाज करून मनुष्य थकतो, बेजार होतो तेथे योगाच्या क्रियांनी आश्चर्यकारक लाभ होतोच होतो.  अनेक वर्षांचे जुने विकारही शेवटी योगिक उपचारांनी आणि प्राथमिक आयुर्वेदाचे साहाय्याने बरे होऊ शकतात. मात्र काही विकार, जसे अकार्यक्षम झालेले अवयव, हृदयाची व फुफ्फुसांची असाध्य सूज किंवा शस्त्रक्रिया करण्या...

डेंग्यू विषयी माहिती...

इमेज
प्रस्तावना:- समाजामध्ये अनेक आजाराच्या समस्या आहेत. त्यापैकीच एक असलेली समस्या म्हणजे डेंग्यू होय. आपला समाज अनेक वर्षापासून या आजारांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण तरीही दरवर्षी अनेक जन या आजारांना बळी पडत आहेत. याचे कारण आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून आपल्या घरात आणि परिसरात डेंग्यू आजार प्रसार करणारे डास उत्पत्ती होणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेतली तर डेंग्यू रुग्णाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे सहज शक्य आहे.  डेंग्यू  आजाराविषयी - डेंग्यू ताप हा आजार डेंग्यू विषाणूमुळे ( अर्बोव्हायरस ) होणारा विषाणूजन्य आजार आहे. डेंग्यूच्या विषाणूचे चार प्रकार डेंग्यू-1, डेंग्यू- 2, डेंग्यू- 3, डेंग्यू-  4 असे आहेत. डेंग्यू तापाचा प्रसार रुग्ण व्यक्ती पासून निरोगी व्यक्तीला ' एडिस इजिप्ती'  डासाच्या चावण्याने होतो.  डेंग्यू विषाणूची वाढ डासांमध्ये साधारणपणे आठ ते दहा दिवसात पूर्ण होते. हा विषाणू युक्त डास मरेपर्यंत  दूषित राहून अनेक व्यक्तींना डेंगीचा प्रसार करू शकतो. या डासाच्या पायावर पांढरे पट्टे असतात म्हणून त्यांना ' टायगर  मॉस...