DIET TO PREVENT HEART DISEASE / हृदयविकार टाळण्यासाठी आहार
DI ET TO PREVENT HEART DISEASE: हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा. DI जाणून घ्या लक्षणे आणि उपाय,आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरावर मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. जेवणाची, झोपण्याची वेळ चुकत असल्याने त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. त्यामुळे आजकालच्या तरुणाईला विविध रोगांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय वाढत्या प्रदूषणामुळे आपले शरीर कमकुवत होत चालले आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच हृदयविकाराचा त्रास संभवत आहे. आधीच्या काळात हृदयविकार हा आजार वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र आता हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होत आहे. WHO आणि अमेरिकन जर्नलच्या अभ्यासानुसार, 30 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयाच्या समस्यांमध्ये 13 टक्के वाढ झाली असल्याचे म्हणले आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठा आजार हृदयविकार हा झाला आहे. अहवालानुसार गेल्या तीन दशकांत भारत देशात हृदयविकाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अगदी दुप्पट झा...