उष्णतेच्या लाटापासून बचाव करण्यासाठी काय करावे .

        


उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आरोग्याच्या विविध तक्रारी जाणवतात. उन्हाळ्यात अनेकांना डीहायड्रेशनचा त्रास होत असल्यामुळे भरपूर पाणी प्यायला हवे

तसेच दूषित पाण्यामुळे संसर्ग होऊ नये म्हणून नेहमी शुद्ध पाणी प्यायला हवे. ऋतूमानात बदल झाला, तर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.

उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ, प्रखर सूर्य प्रकाश यामुळे दुपारी बाहेर पडणे आरोग्यावर परिणाम करू शकते

उष्माघातापासून व निरनिराळ्या उन्हाळी विकारांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक काळजी सर्वांनी घ्यावी

उन्हाळ्याचा कडाका कमी करण्यासाठी अनेक जण उघड्यावरील थंडपेय व खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतात

मात्र दूषित हवामानामुळे हवेतील जंतुसंसर्गाला पोषक असे वातावरण तयार झाले असून उघड्यावरील कोणतेही खाद्य पदार्थ आणि थंड पेये, फळांच्या फोडी खाणे हे अनारोग्याला आमंत्रण देण्यासारखे असून या गोष्टी टाळायला हव्यात.  

अंगदुखी, अंगात बारीक ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, घसा दुखणे असे त्रास उद्भवल्यानंतर लगेचच वैद्यकीय उपचार घ्यावेत.

  उष्णतेच्या लाटापासून बचाव करण्यासाठी काय करावे अथवा काय करू नये  

      काय करावे :- 

  1.बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/टोपी, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा.

  2.प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.

  3.उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर        करण्यात यावा.

  4.तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.

  5.हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

  6.उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.

    तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकावा.

  7.शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी,

  लिंबू पाणी, ताक  इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा.

  8.अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची

      चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

9.गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.

10.घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.

11.तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.

12.पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.

13.कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

14.सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करावे.

15.पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.

16.बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

17.गरोदर महिला व आजारी व्यक्तींची अधिकची काळजी घेण्यात यावी.

18.जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

काय करू नये :-

1.दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.

2.गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

3.बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, तसेच दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे.

4.उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे.

5.तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

6.शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा.

7.शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे.

8.उष्णता शोषून घेणारे काळे किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024