
26 मार्च राष्ट्रीय पालक
भाजी दिवस - पालक ही सर्वांना
परिचित पालेभाजी असून या भाजीची लागवड वर्षभर करता येते. पालक भाजी अ, क, जीवनसत्त्वे प्रोटीन्स, कॅल्शियम , लोह, फॉस्फरस खनिजे मुबलक प्रमाणात असतात. रोजच्या जेवणात पालकभाजी वेगवेगळ्या प्रकारे तयार करून आहारात उपयोग केला जातो.
1) पालक चे सेवन वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते पालकमध्ये वजन कमी करणारे गुण असतात पालक कमी कॅलरी वाली भाजी आहे जिला आहारात समाविष्ट केल्याने वजन नियंत्रणात राहते.
2) डोळ्यांच्या समस्या पासून दूर राहण्यासाठी पालकचे सेवन उपयोगी आहे पालक डोळ्यांमध्ये होणारे मॅक्युलार डीजनरेशन या नेत्र रोगाला नियंत्रित करते.
3) पालकचे सेवन कॅन्सर सारख्या रोगाला दूर करण्यास मदत करते पालक हाडांच्या निर्माणापासून ते त्यांच्या विकासापर्यंत मदत करते आणि हाडांना मजबुती प्रदान करते पालकमध्ये कॅल्शियम आढळतात जे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असते.
4) पालकमध्ये कॅल्शियमचे प्रमाण आढळते त्यामुळे मेंदूला चालना मिळते व स्मरणशक्ती वाढते.
5) हार्ट अटॅकचा धोका दूर करण्यासाठी पालकचे सेवन प्रभावी ठरते स्ट्रोक आणि हार्ट अटॅक मुळे होणाऱ्या मृत्यूचे जो किम कमी करते.
6) पालक फायबर आणि पाण्याने भरलेले असते फायबर पचन तंत्र व्यवस्थित कार्यरत ठेवते पालक खाल्ल्याने अपचन गॅसेस यासारख्या समस्या दूर होतात पालक पोटाच्या कॅन्सर पासूनही वाचवते.
7) पालक भाजी प्रथम धुवून नंतर कापून घ्यावी जर कापल्यानंतर धुतली तर विटामिन B12 व निघून जाते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा