World Tuberculosis Day 24 March 2023. जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च 2023
24 मार्च 2023:जागतिक क्षयरोग दिन, यावर्षीचे स्लोगन " YES! WE CAN END TB " होय! आपण टीबी संपवू शकतो असे आहे.
मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जिवाणूमुळे क्षयरोग ( टीबी )हा संसर्गजन्य रोग होतो.
क्षयरोगाची लक्षणे:-
क्षय रोगाचे मुख्य लक्षण बेडकायुक्त खोकला दोन आठवडे किंवा जास्त दिवसाचा त्याचबरोबर सोबत ही लक्षणे असू शकतात. 1.हलकासा वाढणारा संध्याकाळचा ताप 2.वजन कमी होणे. 3.भूक न लागणे. 4.थुंकीतून रक्त येणे. 5.संध्याकाळी घाम येणे.
टीबी होण्याची शक्यता या मुलांमध्ये जास्त असते-
1. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला क्षयरोगाची लागण झाली असल्यास त्या घरातील मुले. 2. संशयित क्षयरुग्ण असल्यास त्या घरातील व्यक्तींला टीबी होण्याची शक्यता असल्यास त्या घरातील मुले. 3. ज्या मुलांना एचआयव्ही आहे ती मुले. 4. ज्या देशात, शहरात, गावात ,टीबीचे पेशंट जास्त आहेत अशा देशातील शहरात, गावात मुले. 5) कुपोषित किंवा अशक्त मुले.
लसीकरण:-
बीसीजी लसी मुळे मुलांमध्ये टीबीची शक्यता कमी होते.
क्षयरोगावरील औषधोपचार:-
डॉटस् हा टीबी वरचा उपचार साधारणपणे वापरात असतो. डॉट्स औषधोपचाराचा कालावधी सहा ते आठ महिन्याचा असतो.
फुफ्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग :-(Extra - Pulmonary TB )
रुग्णांचा पूर्व इतिहास जाणून व रुग्ण तपासणी करून फुफुसा खेरीज इतर कोणत्याही अवयवाचा क्षय असल्यास त्याला फुफ्फुसाव्यतिरिक्त (एक्स्ट्राँपल्मनरी) क्षयरोग म्हणावे.
रुग्णाला फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवाचा क्षयरोग झाल्यास शरीरातील ज्या अवयवाचा क्षयरोग झाला असेल त्याप्रमाणे लक्षणे दिसून येतात. 1) गंडमाळा( लसिका ग्रंथी) क्षयरोग मानेवर सूज व गाठी येतात. 2)प्लुरल इफ्युजन:- धाप लागणे. 3) पोटाचा आतड्याचा क्षयरोग:- पोट दुखणे, उलटी होणे. 4) मेंदूच्या आवरणाचा क्षयरोग ( मेनिन्जायटीस ):- डोकेदुखी ताप, ग्लानी ,मानेचा, ताटरपणा इत्यादी. 5) मणक्याचा क्षयरोग( पाँटस स्पाईन):- दीर्घकालीन पाठ दुखणे ,पाठीवर कुबड निघणे , ताप येणे इत्यादी. 6) गर्भाशयाचा क्षयरोग :- मूल न होणे. 7) मूत्रपिंडाचा क्षयरोग :- लघवीतून रक्त जाणे. 8) हाडाचा क्षयरोग :- लवकर न भरून येणारी जखम
क्षयरोग कशामुळे होतो ?
क्षयरोग म्हणजे टीबी हा रोग संसर्गामुळे होणार आहे तो अनुवंशिक नाही. क्षयरोग कोणालाही होऊ शकतो. कोणतीही गंभीर क्षयरोग ग्रस्त व्यक्ती जेव्हा तिच्या तोंडावर हात अथवा रुमाल न धरता खोकते किंवा शिंकते तेव्हा थुंकीच्या फवाऱ्याद्वारे क्षयरोगास कारणीभूत असणारे जिवाणू (बॅक्टेरिया) बाहेर येतात आणि आसपास असणाऱ्या व्यक्तींच्या श्वासावाटे त्यांच्या शरीरात प्रवेश करतात.
- क्षयरोगाचे निदान डॉट्स टीबी केंद्रामध्ये पूर्णपणे मोफत करता येते.
- क्षयरोग झालेल्या व्यक्तींना क्षयरोगावरील औषध उपचार शासकीय दवाखान्यामध्ये मोफत मिळतात.
हे करावे
क्षयरोगावरील सर्व औषधे नियमितपणे व सांगितल्याप्रमाणे घ्या.
खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरा.
कोठेही उघड्यावरती थुंकू नये.
हे टाळावे
डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषध बंद करू नका.
क्षयरोग्यांना भेदभावाने वागवू नका.
वाटेल तेथे थुंकू नका.
डॉटस् म्हणजे काय?
डॉटस् म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व्ड् ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स.
डॉटस् चे फायदे कोणते?
डॉटस् मुळे ९५ टक्के रोगी बरे होतात.
डॉटस् मुळे क्षयरोगावर खात्रीशीर इलाज होतो.
डॉटस् मुळे भारतातील क्षयरोग्यांचे आयुष्यच बदलले आहे.

Nice Information
उत्तर द्याहटवाVery useful 👌
Good information
उत्तर द्याहटवा