World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024

 




मलेरियाचा नायनाट करण्यासाठी कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करून व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्यांचा सहभाग प्राप्त करून घेण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस हिवताप दिन साजरा करण्यात येतो.

 राज्याच्या सततच्या आणि सामूहिक प्रयत्नामुळे देशाने मलेरिया प्रकरणे आणि मृत्यूमध्ये लक्षणीय घट केले आहे. 

सर्वसाधारण माहिती :- 

हिवताप हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतूपासून होतो. हिवतापाच्या जंतूचे फॅल्सीफेरम व व्हायव्हँक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात  हिवतापाचा प्रसार अँनाफिलीस डासाच्या मादीमार्फत होतो.हिवतापाचा आधिशयन काळ 10 ते 12 दिवसाचा असतो.

1) हिवताप (Malaria) :-
     लक्षणे :-

  • थंडी वाजून ताप येणे.
  • ताप हा सतत येऊ शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो.
  • नंतर घाम येऊन अंग गार पडते.
  • ताप आल्यानंतर डोके दुखते.
  • बऱ्याच वेळा उलट्याही होतात.

2) मेंदूचा हिवताप ( Cerebral Malaria) फॅल्सीफेरम प्रकारच्या हिवताप रुग्णास वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास मेंदूचा हिवताप होऊ शकतो लक्षणे :- तीव्र ताप,तीव्र डोकेदुखी / व उलट्या होणे,मान ताठ होणे,झटके येणे,बेशुद्ध होणे.

रोगनिदान :- 1) प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करून 2)  तात्काळ निदान पद्धती (Rapid Diagnostic Kit) यामध्ये हिवतापाचे खात्रीशीर निदान रुग्ण व्यक्तीचा रक्त नमुना तपासून करता येते

डासांचे जीवनचक्र :-  अंडी  ->  अळी   -कोष  ->  पूर्ण डास 

(पाण्यातील अवस्था कालावधी 8 ते 10 दिवस) (पाण्याबाहेर अवस्था साधारणपणे 3 आठवडे)

रोगजंतूची  माहिती :-
रोग प्रसार कसा होतो

हिवतापाचा प्रसार अँनाफिलीस जातीच्या मादी डासांमार्फत होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ साठून राहिलेल्या उदा.स्वच्छ पाण्याची मोठी डबकी, नाले, भात शेती, नदी, पाण्याच्या टाक्या इत्यादी मध्ये होते. डास जेव्हा हिवताप रुग्णास चावतो त्यावेळेस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात तेथे जंतूची वाढ होऊन ते जंतू डासांच्या लाळेवाटे निरोगी मनुष्यांच्या शरीरात सोडले जातात मनुष्याच्या शरीरात हे जंतू यकृत मध्ये जातात आणि तेथे त्यांची वाढ होऊन दहा ते बारा दिवसांनी मनुष्याला थंडी वाजून ताप येतो.

डास नियंत्रणासाठी.....

प्रतिबंधात्मक उपाययोजना –

हिवताप प्रसारक अँनाफिलीस डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते.डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी उपाययोजना- पाणी साठविण्याची भांडी घट्ट झाकून ठेवा. घराच्या अवतीभवती असलेले टायर, बाटल्या व प्लास्टिक डबे नष्ट करावे यामध्ये पाणीसाठा होऊ देऊ नका.घरात झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा,डासांना पळवून लावणाऱ्या अगरबत्तीचा वापर करावा. घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा. सांडपाण्याची विल्हेवाट शोषखड्यातून लावा. परसबाग फुलवा. पाण्याची डबकी बुजवा किंवा ती वाहती करा. घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा. मोठ्या पाणीसाठ्‌यामध्ये गप्पी मासे सोडा.शौचालयाच्या व्हेंट पाईपला वरच्या बाजूला जाळी बसून घ्या. नेहमी पूर्ण बाह्याचे कपडे घालावेत.

वरील सर्व उपाय योजनांचा अवलंब केल्यास डासामार्फत प्रसार होणारे हिवताप, डेंग्यू ,चिकनगुनिया, झिका, जपानी मेंदूज्वर, हत्तीरोग या आजारापासू आपण मुक्त होऊ व आपल्या भावी पिढ्यांना आरोग्यदायी जीवनाचा अमूल्य ठेवा देऊ.

 

 

 

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डेंग्यू विषयी माहिती...

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन