उष्णतेच्या लाटापासून बचाव करण्यासाठी काय करावे .
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आरोग्याच्या विविध तक्रारी जाणवतात . उन्हाळ्यात अनेकांना डीहायड्रेशनचा त्रास होत असल्यामुळे भरपूर पाणी प्यायला हवे . तसेच दूषित पाण्यामुळे संसर्ग होऊ नये म्हणून नेहमी शुद्ध पाणी प्यायला हवे . ऋतूमानात बदल झाला , तर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो . उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ , प्रखर सूर्य प्रकाश यामुळे दुपारी बाहेर पडणे आरोग्यावर परिणाम करू शकते . उष्माघातापासून व निरनिराळ्या उन्हाळी विकारांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक काळजी सर्वांनी घ्यावी . उन्हाळ्याचा कडाका कमी करण्यासाठी अनेक जण उघड्यावरील थंडपेय व खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतात . मात्र दूषित हवामानामुळे हवेतील जंतुसंसर्गाला पोषक असे वातावरण तयार झाले असून उघड्यावरील कोणतेही खाद्य पदार्थ आणि थंड पेये , फळांच्या फोडी खाणे हे अनारोग्याला आमंत्रण देण्यासारखे असून या गोष्टी टाळायला हव्यात . अंगदुखी , अंगात बारीक ताप , सर्दी , खोकला , घसा खवखवणे , घसा दुखणे असे त्रास उद्भवल्यानंतर लगेचच वैद्यकीय उपचार घ्यावेत. ...